संजू चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस... ११ वर्षांनंतर एकत्र आले सोनम कपूर आणि रणबीर कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 12:12 IST2018-05-25T06:42:14+5:302018-05-25T12:12:14+5:30

सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावरिया या चित्रपटापासून केली. या चित्रपटातील दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली ...

Sonam Kapoor and Ranbir Kapoor came together after 11 years of the new poster of Sanju film ... | संजू चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस... ११ वर्षांनंतर एकत्र आले सोनम कपूर आणि रणबीर कपूर

संजू चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस... ११ वर्षांनंतर एकत्र आले सोनम कपूर आणि रणबीर कपूर

नम कपूर आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सावरिया या चित्रपटापासून केली. या चित्रपटातील दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ११ वर्षांहून अधिक वर्षं झाली आहेत. गेल्या ११ वर्षांत सोनम आणि रणबीर दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण या ११ वर्षांत त्या दोघांना पु्न्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र पाहाण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळालेली नव्हती. पण आता सोनम आणि रणबीर कपूर संजू या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.
संजू या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या पोस्टमध्ये आपल्याला सोनम आणि रणबीरला एकत्र पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये सोनमचा लूक खूपच वेगळा आहे. सोनमचे केस हे छोटे असून तिने छानशी डगरी घातलेली आहे. तसेच मस्तीच्या मुडमधील रणबीर आणि सोनमचा पोस्टरवरील फोटो पाहून या दोघांमधील केमिस्ट्री मस्त जुळून आली असल्याचे दिसून येत आहे. हे पोस्टर आपल्याला संजय दत्तच्या रॉकी या पहिल्या चित्रपटाची आठवण करून देते. सोनम आपल्याला या चित्रपटात अभिनेत्री टीना मुनिमच्या भूमिकेत दिसणार आहे. 
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करतायेत. ज्यात संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरमध्ये रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले आहे. स्वत: संजय दत्त रणबीरचा अभिनय पाहुन थक्क झाला होता. या चित्रपटाच्या टीझरनंतर एक पोस्टर आऊट झाले होते. या पोस्टरमध्ये संजयच्या तरुणवयापासून ते आजपर्यंतची विविध रूपे प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. राजकुमार हिराणी यांनी आधी या चित्रपटाचे नाव दत्त ठेवण्याचा विचार केला होता. मात्र नर्गिस संजय दत्तला 'संजू' या नावाने हाक मारत असल्याने चित्रपटाचे नाव संजू ठेवण्यात आले. 

Also Read : सोनम कपूरने म्हटले, ‘सेक्ससाठी लग्नाची प्रतीक्षा करीत नाहीत मुली’!

Web Title: Sonam Kapoor and Ranbir Kapoor came together after 11 years of the new poster of Sanju film ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.