सोनम झाली भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 14:38 IST2017-04-29T09:08:59+5:302017-04-29T14:38:59+5:30
‘बॉलिवूडची मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिची आजी दौपदी हिंगोरानी भांबानी यांचा अलीकडेच मृत्यू झाला आहे. ८९वर्षीय आजी आपल्या आयुष्यातून ...

सोनम झाली भावूक!
‘ ॉलिवूडची मस्सकली गर्ल’ सोनम कपूर हिची आजी दौपदी हिंगोरानी भांबानी यांचा अलीकडेच मृत्यू झाला आहे. ८९वर्षीय आजी आपल्या आयुष्यातून गेल्याचा विचारही तिला करवत नाहीये. ती सध्या तिच्या आजीच्या आठवणींमध्येच रमत आहे. त्यामुळे तिने इन्स्टाग्रामवर तिच्या आजीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात सोनम खुपच लहान दिसते आहे. तिने असे देखील पोस्ट केले आहे की,‘ नानी, मला तुझी खुप आठवण येत आहे. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे. मला सर्वकाही शिकवण्यासाठी मी तुझी आभारी आहे.’ तसेच तिची बहीण रिहा कपूर हिनेही तिच्या आजीसाठी एक इमोशनल मेसेज पोस्ट केला आहे. ती तिच्या आजीला ‘उत्साह आणि प्रेरणा’ असे संबोधते. तिनेही तिचा लहानपणीचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘एक उत्कृष्ट महिला, तिचा वारसा. मला नेहमी तु शिकवलेल्या गोष्टी स्मरणात राहतील. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन.’
![]()
![]()