संजूबाबाच्या बायोपिकमध्ये सोनम बनणार माधुरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:59 IST2016-12-04T17:59:50+5:302016-12-04T17:59:50+5:30

संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची चर्चा सध्या ‘बी टाऊन’ मध्ये गाजतेय. रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका करणार हे ...

Sonam to become Madhumika in Sanjubaba's biopic? | संजूबाबाच्या बायोपिकमध्ये सोनम बनणार माधुरी?

संजूबाबाच्या बायोपिकमध्ये सोनम बनणार माधुरी?

जय दत्त याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची चर्चा सध्या ‘बी टाऊन’ मध्ये गाजतेय. रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका करणार हे निश्चित झाले आहे. तर संजूबाबाच्या आयुष्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेची भूमिका सोनम कपूर साकारणार असल्याचे कळतेय. आता ही महिला कोण? तर माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित पडद्यावर साकारायला मिळणं ही सोनम कपूरच्या आयुष्यातील सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. 



‘लाखों दिलों की धडकन’ माधुरी दीक्षित हिचे संजूबाबासोबतचे संबंध फार जुने आहेत. त्या दोघांनाही त्यांचे वैयक्तिक संबंध चित्रपटात चित्रीत होऊ द्यायचे नाहीत. सूत्रांकडून तर असेही कळालेय की, संजूबाबाच्या बायोपिकची चर्चा सुरू झाली, तसा माधुरीने संजय दत्तला फोनही केला होता की, चित्रपटात तिचा संदर्भ देण्यात येऊ नये. पण, माधुरी तर संजूबाबाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. त्यामुळे तिला वगळून बायोपिक बनवणे म्हणजे चित्रपट अर्धवट ठेवणे असा त्याचा अर्थ होईल. 



हरहुन्नरी कलाकार सोनम कपूर हिने आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. माधुरी दीक्षितची भूमिका साकारणं हे कोणत्याही अभिनेत्रीचं स्वप्न असू शकतं. पण आता मात्र हे स्वप्न सोनमला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे सोनमबद्दल असे म्हणावे लागेल,‘ आजकल पाव जमीं पर, नही पडते मेरे...!’

Web Title: Sonam to become Madhumika in Sanjubaba's biopic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.