सोनाक्षीला व्हायचेय निर्माती; चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 16:13 IST2016-11-05T16:13:11+5:302016-11-05T16:13:11+5:30

बॉलिवूड ‘शॉटगन’ सोनाक्षी सिन्हा ही आता अभिनय, गायन याबरोबरच निर्मितीक्षेत्रामध्येही आपले टॅलेंट आजमावू पाहत आहे. तिच्या नावावर आत्तापर्यंत अनेक ...

Sonakshila to be produced; Looking for good script! | सोनाक्षीला व्हायचेय निर्माती; चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात!

सोनाक्षीला व्हायचेय निर्माती; चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात!

लिवूड ‘शॉटगन’ सोनाक्षी सिन्हा ही आता अभिनय, गायन याबरोबरच निर्मितीक्षेत्रामध्येही आपले टॅलेंट आजमावू पाहत आहे. तिच्या नावावर आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दाखल झालेले असले तरीही एक नवी जबाबदारी पेलण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. 

तुम्ही म्हणाल ही नवी जबाबदारी कोणती? जरा थांबा तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की, सोनाला म्हणे निर्माती होण्याची स्वप्ने पडू लागली आहे. ती म्हणे आता चांगल्या स्क्रिप्टच्या शोधातही आहे. ती आता तिचे भाऊ लव्ह आणि कुश सिन्हा यांच्यासोबत एक प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहे. तिला हवीय आता केवळ एक चांगली स्क्रिप्ट. तिचे भाऊ हे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून केवळ चित्रपटाकडे लक्ष देतील, तर सोना चित्रपट, कथानक, स्टारकास्ट, निर्मिती याकडे लक्ष देणार असे ठरलेय.

‘अकिरा’,‘फोर्स २’ या अ‍ॅक्शनपटांमुळे सोना सध्या चर्चेत आहे. सुपर टॅलेंटेड कोस्टार्स सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि अजय देवगण यांच्याकडून तिला प्रेरणा मिळाली आहे. निर्मितीक्षेत्रामध्ये तिने स्वत:ला एवढे व्यस्त करून टाकले आहे की, सोशल मीडियावरही ती चाहत्यांसोबत नवनव्या थीम्स, कथानक यांच्यावर चर्चा करत असते. वेलडन..सोना तु नक्कीच एक उत्तम निर्माती होशील.

Web Title: Sonakshila to be produced; Looking for good script!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.