...म्हणून मनीषा पुन्हा लग्न करु इच्छिते !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 15:03 IST2016-09-10T09:33:22+5:302016-09-10T15:03:22+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइराला पुन्हा लग्न करण्याचा विचार करीत आहे. दिर्घ विश्रांती नंतर मनीषा बॉलिवूडमध्ये ‘मौली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ...

...म्हणून मनीषा पुन्हा लग्न करु इच्छिते !
मनीषाने आपल्या लग्नाच्या योजनेबाबतीतही चर्चा केली आहे. २०१० मध्ये मनीषाने नेपाळच्या मोठ्या व्यापाऱ्याशी लग्न केले होेते. मात्र दोन वर्षानंतरच दोघांचा घटस्पोट झाला. तरीही आजदेखील मनीषाचे लग्नाबाबतचे विचार सकारात्मकच आहेत. तिने सांगितले की, ‘कोण लग्न नाही करु इच्छिते, सुरूवातीला हे सर्व चांगलं असतं, मात्र त्यानंतर आपण समजू शकत नाही. जर का मला चांगला मनुष्य मिळाला तर मी लग्नाबाबत नक्कीच विचार करेल.
विशेष म्हणजे ती एका बालकाला दत्तक घेऊ इच्छिते. तिने सांगितले की, ‘मी जेव्हा लहान होती, तेव्हापासून माझी एका बालकाला दत्तक घेण्याची इच्छा आहे. मी माझ्या परिवाराशी खूप निगडीत आहे. मात्र ते नेपाळमध्ये राहतात. मी जेव्हा घरी येते तेव्हा खूपच एकाकी फिल करते.’
या एकाकीपणाला कंटाळूनच कदाचित मनीषा लग्नाचा विचार करतेय.