म्हणून अजय देवगणने या चित्रपटातसाठी दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:24 IST2017-11-11T06:39:31+5:302018-04-03T14:24:15+5:30

बॉलिवूडमध्ये काही अशा जोड्या आहेत जे एकत्र कामा करता करता एकमेंकाच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले.  यातल्या काही ...

So Ajay Devgn refuses to give it in the film | म्हणून अजय देवगणने या चित्रपटातसाठी दिला नकार

म्हणून अजय देवगणने या चित्रपटातसाठी दिला नकार

लिवूडमध्ये काही अशा जोड्या आहेत जे एकत्र कामा करता करता एकमेंकाच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले.  यातल्या काही अभिनेत्रींनी लग्ननंतर घराला प्रथम प्राधान्य दिले आणि पतीने त्याचे बॉलिवू़डमधील करिअर सुरु ठेवले. याच उत्तम उदाहरण म्हणजे अजय देवगण आणि काजोलची जोडी. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या अजय देवगणच्या गोलमाल अगेन चित्रपटांने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. तर काजोलने मुलांची आणि संसारची जबाबदारी समर्थपणे पेलली. अधून मधून तीही चित्रपटात काम करते. नुकताच धनुष्य सोबत ती व्हिआयपी 2मध्ये दिसली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एकेकाळी इश्क सारखा हिट चित्रपट देणारी ही जोडी लग्ननंतर एकत्र का दिसत नाही.  

एका रिपोर्टनुसार अजयने काजोलसोबत काम करण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजयकडे एक चित्रपट आला होता ज्याच्या मेकर्सना अजय आणि काजोलच्या जोडीला घेऊन चित्रपट तयार करायचा होता. मात्र यासाठी अजयने नाकार दिल्याचे समजतेय. अजयला आता करिअरच्या या टप्प्यावर येऊन कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे. अजयला मसाला चित्रपटांमध्ये काम करायते आहे. त्यामुळे त्यांने काजोलसोबत काम करण्यास नकार दिला होता.   
कदाचित काजोलने पण अजयच्या निर्णयाला पाठिंबा दिला असेल आणि बघायला गेलं तर यू मी और हम, टूनपुर का सुपरहिरो आणि राजू चाचा हे चित्रपट ज्यात अजय आणि काजोल ने एकत्र काम केले होते हे सगळे चित्रपट फ्लॉप ठरले होते. 

‘आता माझी सटकली’ हे अजयच्या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. हा चित्रपट मराठी असेल. रोहित शेट्टी व अजय देवगण या गोडजोडीने  मराठी चित्रपटासाठीही हातमिळवणी केली आहे. अजयने स्वत: ही माहिती दिली आहे. ‘अ‍ॅक्शन थ्रीलर मराठी चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत. आता माझी सटकली, हे या चित्रपटाचे शीर्षक आहे. रोहितने शीर्षकाची नोंदणीही केली आहे. अर्थात हा चित्रपट रोहित दिग्दर्शित करेल वा नाही, हे अद्याप ठामपणे सांगता येणार नाही. तो प्रयत्नशील आहे. तो किंवा अन्य कुणी दिग्दर्शक हा चित्रपट दिग्दर्शित करेल,’असे अजयने ताज्या मुलाखतीत सांगितले.

Web Title: So Ajay Devgn refuses to give it in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.