Sizzelling : बॉलिवूडच्या हॉट ‘पोल डान्सर्स’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 12:32 IST2017-07-19T06:52:55+5:302017-07-19T12:32:27+5:30
अबोली कुलकर्णी ‘पोल डान्सिंग’ हा डान्सप्रकार पूर्वी बारमध्ये केला जायचा. पण, आता याकडे शरीराला उत्तम आकार आणि लवचिकता मिळवून ...

Sizzelling : बॉलिवूडच्या हॉट ‘पोल डान्सर्स’!
‘पोल डान्सिंग’ हा डान्सप्रकार पूर्वी बारमध्ये केला जायचा. पण, आता याकडे शरीराला उत्तम आकार आणि लवचिकता मिळवून देणारा डान्सप्रकार म्हणून पाहिले जाते. तसेच बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये या डान्सप्रकाराला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये या पोल डान्सिंगचा वापर करण्यात आला आहे. बॉलिवूडमध्ये हॉट अॅण्ड सेक्सी मुव्ह्जनी घायाळ करणाऱ्या काही अभिनेत्री आहेत. ज्यांना आपण पोल डान्सिंग करणाऱ्या अभिनेत्री म्हणून देखील ओळखतो. जाणून घेऊयात मग या पोल डान्सर्सचे या डान्सिंगमागील कसब आणि प्रवास....
* जॅकलीन फर्नांडिस
श्रीलंकन ब्युटी म्हणून आपण जॅकलीन फर्नांडिस हिला ओळखतो. ती सध्या आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील तिच्या भूमिकेसाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. तिचा अलीकडेच पोल डान्सिंग करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती पोल डान्सिंग करताना दिसते आहे. तिचे मुव्ह्ज आपल्याला तिच्या प्रेमात पाडतात.
* सनी लिओनी
बॉलिवूडच्या हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनी हिला ओळखले जाते. पोल डान्सिंग करतानाच्या तिच्या हॉट डान्स मुव्ह्ज आपल्याला घायाळ करतात, हे नक्की. तिच्या पोल डान्सला सोशल मीडियावर अनेक लाईक्स मिळाले आहेत. सनी डान्सप्रकारासोबतच या प्रकाराला वर्कआऊटच्या दृष्टीकोनातून पाहते.
* पूनम पांडे
बॉलिवूडमधील अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते. तिने तिचे व्हिडीओ हे इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर शेअर केले आहेत. तिचा पोल डान्स हा खरंच आपल्याला भूरळ घालणारा असतो. पोल डान्स ती तिच्या स्टाईलने करताना दिसते.
* जरीन खान
‘वजह तुम हो’ अभिनेत्री जरीन खान हिने अनेक गाण्यांमध्ये पोल डान्स हा प्रकार सादर केला आहे. तिने काही गाण्यांमध्ये हा डान्स सादर करताना तिचे ५३ किलो वजन कमी केले होते. तिचा पोल डान्स हा खरंच पाहण्यासारखा आहे.
* ईशा गुप्ता
सध्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता ही छोट्याशा भूमिकेत दिसते आहे. तिचा छोटासाच पण महत्त्वपूर्ण असा रोल असतो. ती देखील अतिशय उत्कृष्टरित्या पोल डान्सिंग करते. ती पोल डान्सिंगला एक चांगला वर्कआऊट समजते. शरीराला योग्य आकार आणि लवचिकता येण्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम मानला जातो. ‘बादशाहो’ अभिनेत्री ईशाने तिचे काही पोल डान्सिंग व्हिडीओज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.