Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : लेकाच्या लग्नासाठी जैसलरमेरमध्ये पोहोचले सिद्धार्थ मल्होत्राचे वडील, व्हिडीओ पाहून चाहते भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 10:07 AM2023-02-05T10:07:46+5:302023-02-05T10:09:28+5:30

Sidharth Malhotra Father: काल शनिवारी सिद्धार्थ व कियारा दाेघांचेही कुटुंबीय, मित्रमंडळी जैसलमेर येथे दाखल झालेत. याचे एक ना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता सिद्धार्थच्या वडिलांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Sidharth Malhotra Father Arrived At Jaisalmer Airport On A Wheelchair Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding | Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : लेकाच्या लग्नासाठी जैसलरमेरमध्ये पोहोचले सिद्धार्थ मल्होत्राचे वडील, व्हिडीओ पाहून चाहते भावुक

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : लेकाच्या लग्नासाठी जैसलरमेरमध्ये पोहोचले सिद्धार्थ मल्होत्राचे वडील, व्हिडीओ पाहून चाहते भावुक

googlenewsNext

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी उद्या ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी आज कियाराच्या हातांवर सिडच्या नावाची मेहंदी सजणार आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहेत. काल शनिवारी दाेघांचेही कुटुंबीय, मित्रमंडळी जैसलमेर येथे दाखल झालेत. याचे एक ना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता सिद्धार्थच्या वडिलांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात सिडचे पापा व्हिलचेअरवर दिसत आहेत. काल रात्री नवरदेवाचे वडील सुनील मल्होत्रा जैसलमेर येथे पोहोचले. विमानतळावरचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने सिडच्या वडिलांचा विमानतळावरचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ समोर येताच, सिद्धार्थचे चाहते काहीसे भावुक झालेले दिसत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली आहे. प्लीज हा व्हिडीओ डिलीट करा, सिडच्या वडिलांची तब्येत बरी दिसत नाहीये आणि हे पाहून सिड अपसेट होऊ शकतो, असं चाहत्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी सिद्धार्थ व त्याच्या कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा आदर करा, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान काल कियारा अडवाणी जैसलरमेरला पोहोचली. सिद्धार्थही आपल्या कुटुंबीयांसोबत जैसलरमेरला दाखल झाला. याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

जैसलमेरमधील सूर्यगढ महलात सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 100 ते 125 पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित राहणार आहेत. पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी खास 84 आलिशान खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. जैसलमेरमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नसोहळ्यात कियारा मनीष मल्होत्राने डिझाईन केलाला ब्रायडल लेहेंगा परिधान करणार आहे. 

Web Title: Sidharth Malhotra Father Arrived At Jaisalmer Airport On A Wheelchair Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.