सिद्धार्थ जीममध्ये गाळतोय घाम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 13:12 IST2016-11-08T13:12:31+5:302016-11-08T13:12:31+5:30

सिद्धार्थ मल्होत्राची बॉडी पाहिली की, कुठलीही फिमेल फॅन त्याच्यावर फिदा झालीच म्हणून समजा!! त्याचे बायसेप्स आणि टोन्ड बॉडी ही ...

Siddhartha gumatoya sweat in jam !! | सिद्धार्थ जीममध्ये गाळतोय घाम!!

सिद्धार्थ जीममध्ये गाळतोय घाम!!

द्धार्थ मल्होत्राची बॉडी पाहिली की, कुठलीही फिमेल फॅन त्याच्यावर फिदा झालीच म्हणून समजा!! त्याचे बायसेप्स आणि टोन्ड बॉडी ही काही सहज मिळालेले नसून जीममध्ये कसरत करून कमावलेली आहे. खरं वाटत नाही का? मग ऐका.. सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतोय. दिवसातील बराचसा वेळ तो जीममध्ये घाम गाळण्यात घालवतोय.

‘बँग बँग’चा सीक्वेल ‘राज अ‍ॅण्ड  डीके’ या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सिद्धार्थ सध्या व्यस्त आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात तो एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना कुठलीही कमतरता राहू नये म्हणून  सिद्धार्थ सध्या जीममध्ये विशेष मेहनत घेतोय.‘हॅण्डसम हंक’ सिद्धार्थने नुकताच जीममधला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ‘गुड थींग्ज टेक टाईम! ट्रान्सफॉर्मेशन जीम..ट्रेनिंग,’असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

‘स्टुडंट आॅफ दी इयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ‘बार बार देखो’, ‘हसी तो फसी’,‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटांमध्ये दिसला. कॅटरिना कैफसोबत काम करण्याचे त्याचे स्वप्न ‘बार बार देखो’ मुळे साकार झाले.  

sidharth malhotra

Web Title: Siddhartha gumatoya sweat in jam !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.