सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या 'ए जेंटलमॅन'मधले 'बात बन जाए' गाणे पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:32 IST2017-07-27T11:59:35+5:302017-07-27T17:32:44+5:30

जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्राचे ए जेंटलमॅन मधले नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यांमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री बघायला मिळाली आहे.

Siddharth Malhotra and Jacqueline Fernandes 'A Gentleman' talk about becoming a song! | सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या 'ए जेंटलमॅन'मधले 'बात बन जाए' गाणे पाहाच!

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या 'ए जेंटलमॅन'मधले 'बात बन जाए' गाणे पाहाच!

द्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा आगामी चित्रपट 'ए जेंटलमॅन'मधले 'बात बन जाए' या गाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. काही वेळा पूर्वीच मेकर्स हे गाणं प्रेक्षकांसमोर आणले आहे. हे गाणं बॉलिवूडचे 'आप जैस कोई मेरी जिंदगी मैं' या जुन्या गाण्याचा रिमेक आहे. या गाण्याचे शूटिंग मिआमीमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे गाण्यात एकपेक्षा एक सुंदर लोकेशन बघायला मिळतायेत. गाण्यात सिद्धार्थ आणि जॅकलिनमधील केमिस्ट्री खुलून आली आहे. या दोघांमधील केमिस्ट्री बघून हा या दोघांचा पहिलाच चित्रपट आहे असे अजिबात वाटतत नाही. या गाण्याला सिद्धार्थ बसरुर आणि प्रियाने गायले आहे.


ALSO READ : ​प्रतीक्षा संपली! ‘ए जेंटलमॅन’चे ‘डिस्को डिस्को साँग’ आले!!

या चित्रपटात सिद्धार्थचा डबल रोल आहे. गौरव आणि ऋषी अशा दुहेरी भूमिकेत तो दिसणार आहे. गौरव हा अत्यंत सुशील मुलगा असतो तर गौरव हा आयुष्यात रिस्क घेणार असतो. जॅकलिन यात काव्या नावाच्या मुलीची भूमिका करते आहे. जी एक बिनधास्त मुलगी असते. काव्या म्हणजेच जॅकलिन गौरवला मस्ती करायला शिकवते असेच या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या आधी ही ए जेंटलमॅनचे पोस्टर आणि रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटात अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भरपूर तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज निधिमोरू आणि डीके यांनी केले असून, हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Web Title: Siddharth Malhotra and Jacqueline Fernandes 'A Gentleman' talk about becoming a song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.