​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट एकमेकांना देणार निवांत वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 12:21 IST2017-05-11T06:51:24+5:302017-05-11T12:21:24+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडचे बेस्ट लव कपल. गेल्या काही महिन्यांत आलिया व सिद्धार्थ यांना फार वेळ ...

Siddharth Malhotra and Alia Bhatt to give each other the time! | ​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट एकमेकांना देणार निवांत वेळ!

​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट एकमेकांना देणार निवांत वेळ!

िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडचे बेस्ट लव कपल. गेल्या काही महिन्यांत आलिया व सिद्धार्थ यांना फार वेळ मिळाला नाही. पण आता आलियाला वेळ द्यायचा असे सिद्धार्थला वाटू लागले आहे. याचाच परिणाम म्हणजे, सिद्धार्थने आलियासोबत एक हॉलिडे प्लान केला आहे. आलिया व सिद्धार्थ दोघेही युरोपात हॉलिडे एन्जॉय करणार आहेत. आणखी काही इंटरेस्टिंग स्पॉटचाही त्यांना शोध आहे.
आलियाने तसाही कामातून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’नंतर काही महिन्यांचा ब्रेक घेण्याचे आलियाने ठरवले होते. नेमक्या याच संधीचा फायदा सिडनेही घ्यायचा ठरवला आहे. युरोपात काही दिवस मस्तपैकी धम्माल मज्जा करण्याचा दोघांचा बेत आहे. खरे तर यापेक्षा आणखी दुसरा चांगला बेत कुठला असू शकतो. शेवटी आयुष्यातील असेच निवांत क्षण रिलेशनशिप घट्ट करत असतात. एकमेकांना अधिक समजून घेण्यात सिद्धार्थ व आलियाला या हॉलिडेची नक्की मदत होणार आहे, हे सांगणे नकोच.

ALSO READ : आलिया भट्टने ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अर्जुन कपूरला टाळण्यासाठी केले असे काही!!

हॉलिडेनंतर आलिया अयान मुखर्जीच्या ‘ड्रगन’ या सिनेमात दिसणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत दिसेल. याशिवाय रणवीर सिंह याच्यासोबत ‘गल्ली बॉय’ नामक सिनेमाही तिने साईन केला आहे. सिद्धार्थचे म्हणाल तर तो सध्या ‘इत्तेफाक’मध्ये बिझी आहे. याशिवाय नीरज पांडेचा एक चित्रपट त्याच्या हातात आहे. शिवाय ‘रिलोडेड’ या चित्रपटात सिद्धार्थ आहे. अलीकडे प्रियांका चोप्रा हिने तिच्या भारतातील आगमनानिमित्त दिलेल्या पार्टीत आलिया व सिद्धार्थ दोघे एकत्र दिसले होते.  ‘बाहुबली2’च्या रिलीजनिमित्त करण जोहरने एक छोटेसे प्रिमीअर ठेवले होते. यावेळीही आलिया व सिद्धार्थ एकत्र पोहोचले होते.

Web Title: Siddharth Malhotra and Alia Bhatt to give each other the time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.