​फरहानशी नाव जोडल्याने श्रद्धा दुखी ; म्हणाली या बातम्या कोण पसरवितो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 20:24 IST2016-11-04T20:24:12+5:302016-11-04T20:24:12+5:30

श्रद्धा कपूर आपले नाव फरहान अख्तरशी जोडले जात असल्याने फारच दु:खी आहे. बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर्सबद्दल बातम्या कोण पसरवितो? असा ...

Shraddha is sad due to the name of Farhan; Said who spreads this news. | ​फरहानशी नाव जोडल्याने श्रद्धा दुखी ; म्हणाली या बातम्या कोण पसरवितो.

​फरहानशी नाव जोडल्याने श्रद्धा दुखी ; म्हणाली या बातम्या कोण पसरवितो.

ong>श्रद्धा कपूर आपले नाव फरहान अख्तरशी जोडले जात असल्याने फारच दु:खी आहे. बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर्सबद्दल बातम्या कोण पसरवितो? असा प्रश्न तिला पाडलाय. अशा बातम्या पसरविणे चुकीचे असल्याचेही श्रद्धा कपूर म्हणाली. 

श्रद्धा म्हणाली, मला आजपर्यंत हेच माहिती झाले नाही की अ‍ॅक्टर्सच्या अफेअरच्या बातम्या येतात तरी कुठून? या बातम्यावर आम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागते. अशा बातम्या लिहणाºया पत्रकारांना हे कळायला हवे की आमच्या घरी आमचे आई-वडिल आहेत, त्यांनाही आम्हाला उत्तरे द्यावी लागतात. ज्यांना माझ्या अफेअरविषयी जाणून घ्यायचे आहे त्यांंना हे कळायलाच हवे की मी सध्या सिंगल आहे, मी केवळ आपले काम आणि चित्रपटांसोबत आनंदी आहे, त्याच्यासोबतच मला रोमांस करायचा आहे. 

 श्रद्धा कपूर व फरहान अख्तर सध्या ‘रॉन आॅन 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशन दरम्यान त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. अशा प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी हे कळत नसल्याने श्रद्धा चांगलीच त्रासली आहे. फ रहान अख्तर पत्नी अनुधापासून वेगळा झाल्यावर त्याचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडण्यात आले. त्याचे नाव काल्की काल्की कोचलीनसोबत व ‘रॉक आॅन 2’मुळे श्रद्धा कपूरसोबत जोडण्यात आले. फरहानने यावर आपला खुलासा दिला आहे. त्याने काल्की किंवा श्रद्धासोबत अफेअर नसल्याचे सांगितले. 



श्रद्धाने नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना आपले स्पष्टीकरण दिले. श्रद्धा म्हणाली, कलाकार म्हणून काम करताना आमच्या करिअरमध्ये अफेअरच्या बातम्या योग्य नसतात. कधी कधी मला असे वाटते की काही जर्नलिस्टस् फक्त कलाकारांच्या लिंकअप किंवा ब्रेकअपच्या बातम्याच का लिहितात. त्यांनी लिहिलेले वाचण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे असे त्यांना वाटत असावे, पण हे चुकीचे आहे. आम्ही जेव्हा आम्ही एखादा इंटरव्हू देतो तेव्हा कामाबद्दल बोलतो, आमच्या चित्रपटांची माहिती देतो. मात्र आम्हाला आमच्या अफेअरविषयी प्रश्न विचारले जातात, आणि हेडिंगसह बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. पत्रकारांनी असे करू नये असेही ती म्हणाली. 

Web Title: Shraddha is sad due to the name of Farhan; Said who spreads this news.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.