श्रद्धा कपूर का शिकणार भाज्या चिरायला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 15:48 IST2016-11-08T15:48:35+5:302016-11-08T15:48:35+5:30
श्रद्धा कपूर सध्या ‘रॉक आॅन2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या आठवड्यात ‘रॉक आॅन2’ रिलीज होणार आहे. म्हणजेच प्रमोशन संपणार आहे ...

श्रद्धा कपूर का शिकणार भाज्या चिरायला?
श रद्धा कपूर सध्या ‘रॉक आॅन2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या आठवड्यात ‘रॉक आॅन2’ रिलीज होणार आहे. म्हणजेच प्रमोशन संपणार आहे आणि यानंतरचा श्रद्धाचा प्लानही तयार आहे. होय, ‘रॉक आॅन2’नंतर श्रद्धा मस्तपैकी ब्रेक घेणार आहे आणि भाज्या चिरायला शिकणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. ते सुद्धा नव्या कुठल्या चित्रपटातील भूमिकेची पूर्वतयारी म्हणून नव्हे तर हे काम मनापासून आवडते म्हणून श्रद्धा भाज्या चिरायला शिकणार आहे. खरे तर सेलिब्रिटीज आणि किचनचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. श्रद्धाच्या बाबतीही ते हे खोटे नाही. श्रद्धाने कधीच स्वत:साठी वा इतरांसाठी जेवण बनवलेले नाही. पण असे असले तरी तिला स्वयंपाक शिकायचा आहे. याचे कारण म्हणजे ती स्वत: प्रचंड ‘फूडी’ आहे. कुकिंगसोबतच किचनमधले भाज्या चिरायचे काम तिला सर्वाधिक आवडते. म्हणूनच अगदी निगुतीने भाज्या कापण्या-चिरण्याची कला तिला आत्मसात करायचीय. ती म्हणते, वेगवेगळ्या आकारात भाज्या कापण्याची एकूण प्रक्रियाच खूप इंटरेस्टिंग आहे. हे काम मला खूप आवडते. त्यामुळेच मी हे काम शिकणार आहे.
खरे तर किचन, कुकिंग हा श्रद्धाचा प्रांत नाही. पण शेवटी कुठलाही गुण वाया जात नाही. श्रद्धा खरेचं भाज्या चिरायला शिकली तर कदाचित तेही तिच्या कामी येईल. तेव्हा यासाठी श्रद्धाला आॅल दी बेस्ट देऊ यात.
‘रॉक आॅन2’मध्ये श्रद्धाने रॉक स्टारची भूमिका साकारली आहे. शिवाय या चित्रपटातील काही गाणीही तिने गायली आहे.