Shocking !! ​‘बाहुबली2’ मधील तमन्ना भाटियाच्या भूमिकेला कात्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 13:31 IST2017-05-03T08:01:17+5:302017-05-03T13:31:17+5:30

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बाहुबली2’ने बॉक्सआॅफिसवरचे सगळे रेकॉर्ड्स तोडण्याचा धडका लावला असतानाच एक शॉकिंग न्यूज आहे. होय, बाहुबली आणि कटप्पापासून ...

Shocking !! Tamanna Bhatia's role in 'Bahubali 2' is sculpture! | Shocking !! ​‘बाहुबली2’ मधील तमन्ना भाटियाच्या भूमिकेला कात्री!

Shocking !! ​‘बाहुबली2’ मधील तमन्ना भाटियाच्या भूमिकेला कात्री!

कत्याच रिलीज झालेल्या ‘बाहुबली2’ने बॉक्सआॅफिसवरचे सगळे रेकॉर्ड्स तोडण्याचा धडका लावला असतानाच एक शॉकिंग न्यूज आहे. होय, बाहुबली आणि कटप्पापासून देवसेना व शिवगामीपर्यंत चित्रपटातील सगळ्या स्टारकास्टची जोरदार प्रशंसा होत असताना, एका व्यक्तिबद्दल मात्र धक्कादायक माहिती कानावर आलीय. ही व्यक्ती कोण तर, महेन्द्र बाहुबलीची प्रेमिका अवंतिका हिची भूमिका साकारणारी तमन्ना भाटिया. पहिल्या पार्टमध्ये म्हणजे ‘बाहुबली: दी बिगनिंग’मध्ये अवंतिका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. पण दुसºया भागात म्हणजे ‘बाहुबली2’मध्ये अवंतिकाची भूमिका काही मिनिटांची आहे. प्रत्येकाला ही स्क्रिप्टची गरज असल्याचे वाटतेय. पण असे नाहीयं. आमच्या कानावर काही वेगळेच आले आहे.



होय, ‘बाहुबली2’मध्ये तमन्नाची भूमिका जाणीवपूर्वक कमी केली गेली, असे कळतेय. हे काम स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी केल्याचेही म्हटले जात आहे. राजमौली यांनी तमन्नाची भूमिका आणि संवादाला कात्री लावत त्यास अगदी काही मिनिटांवर आणून ठेवले. खरे तर चित्रपटाच्या रिलीजपूर्वीही तमन्ना ‘बाहुबली2’च्या प्रमोशनमध्ये कुठेच नव्हती. तेव्हापासूनच याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला येत होत्या. आता तर  तमन्नाची चित्रपटातील नुसत्या काही मिनिटांची भूमिका पाहून, काही तरी मोठे झालेय, या शक्यतेला बळ मिळालेय. सूत्रांचे मानाल तर तमन्ना व राजमौली यांच्या काही मतभेद झाले होते. याच मतभेदांमुळे तमन्नाच्या भूमिकेला कात्री लावली गेली. सोबतच तिला प्रमोशनपासूनही दूर ठेवले गेले.

ALSO READ : तमन्ना भाटियाची होणार ‘बोलती बंद’!

अर्थात तमन्नाने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. मी राजमौलींचा प्रचंड आदर करते, असे ती म्हणाली. आता तमन्ना तर या सगळ्या अफवा म्हणणारच. शेवटी झाकली मूठ सव्वालाखाची!

Web Title: Shocking !! Tamanna Bhatia's role in 'Bahubali 2' is sculpture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.