शाहरुख खानच्या माजी बॉडीगार्डने घेतली सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी, लग्न समारंभाची संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 02:47 PM2023-02-03T14:47:30+5:302023-02-03T14:48:45+5:30

बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत.

shahrukh khans ex bodyguard took up the responsibility of siddharth kiaras security know the full details | शाहरुख खानच्या माजी बॉडीगार्डने घेतली सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी, लग्न समारंभाची संपूर्ण माहिती...

शाहरुख खानच्या माजी बॉडीगार्डने घेतली सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी, लग्न समारंभाची संपूर्ण माहिती...

googlenewsNext

बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारीला हे दोन्ही स्टार्स लग्न बंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही विवाहसोहळा पार पाडणार आहेत. हे लग्न फार कमी आणि खास लोकांमध्येच होणार आहे.

लग्नाच्या तयारीची जबाबदारी मुंबईतील मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीवर सोपवण्यात आली आहे. वेडिंग प्लानरच्या टीमने जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. आणि ४ फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहोचू लागतील. ५ तारखेपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील. एका बाजूला समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ-कियाराची सुरक्षाही एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आली आहे. वृत्तानुसार शाहरुख खानच्या माजी सुरक्षारक्षकाला सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्न सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांची टीम ३ फेब्रुवारीला रवाना होणार असल्याचे समजते.

शाहरुख खानच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडलेले बॉडीगार्ड यासिन बंधू आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्न सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवणार आहेत. यासीन अनेक वर्षांपासून शाहरुखचा बॉडीगार्ड आहे. या लग्नाला मोठे स्टार्स हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये करण जोहर, ईशा अंबानी, शाहिद कपूर आणि मनीष मल्होत्रा ​​यांच्या नावाचाही समावेश आहे. लग्नापूर्वी सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भव्य लग्नाला फक्त १००-१२५ पाहुणे येणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी ८४ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्या अत्यंत महागड्या असून या पॅलेसमधील एका खोलीचं भाडं एका दिवसासाठी सुमारे दीड लाख रुपये आहे. त्याचबरोबर पाहुण्यांच्या वाहतुकीचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. लग्नासाठी ७० वाहनं बुक करण्यात आली आहेत. ज्यात लक्झरी कार देखील आहेत.

Web Title: shahrukh khans ex bodyguard took up the responsibility of siddharth kiaras security know the full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.