‘बाहुबली2’शी शाहरूख खानचे असे आहे कनेक्शन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 10:07 IST2017-03-16T04:35:49+5:302017-03-16T10:07:13+5:30
‘बाहुबली2’मध्ये किंगखान शाहरूख खान दिसणार, अशी अफवा मध्यंतरी पसरली होती. पण शेवटी या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. ...
.jpg)
‘बाहुबली2’शी शाहरूख खानचे असे आहे कनेक्शन!!
‘ ाहुबली2’मध्ये किंगखान शाहरूख खान दिसणार, अशी अफवा मध्यंतरी पसरली होती. पण शेवटी या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. खुद्द दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी ही बातमी स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. ‘बाहुबली2’मध्ये शाहरूखचा गेस्ट अपिअरन्स आहे, ही बातमी धादांत खोटी असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे शाहरूखच्या चाहत्यांची प्रचंड निराशा झाली, हे सांगणे नकोच. पण आता या चाहत्यांना दिलासा देणारी बाब आहे. होय, ‘बाहुबली2’मध्ये शाहरूख दिसणार नसला तरी, त्याचे या चित्रपटाशी कनेक्शन मात्र आहेच. हो, म्हणजेच, शाहरूखने यात भूमिका केली नसली तरी शाहरूखच्या वीएफएक्स कंपनीत ‘बाहुबली2’च्या स्पेशल व्हिज्युअल इफेक्टसचे काम झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाहुबली2’ पूर्णपणे व्हिज्युअल इफेक्ट्सवर आधारित चित्रपट आहे. म्हणजेच, व्हिज्युअल इफेक्ट्स हा चित्रपटाचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. ‘बाहुबली2’तील एका गाण्याचे पूर्णपणे व्हिज्युअल इफेक्ट्सचे काम शाहरूखच्या कंपनीत झाले आहे.
चित्रपटात एक रोमॅन्टिक गाणे आहे. हे गाणे प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्यात एक महाल दिसणार आहे. हा महाल पूर्णपणे व्हीएफएक्सने तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर मुंबईच्या अन्य एका स्पेशल इफेक्ट्स कंपनीही याच कामी लागली आहे.
ALSO READ : शाहरूख खान म्हणतो, त्यासाठी मला छातीवरचे केस वाढवावे लागतील!
‘बाहुबली’मध्ये शाहरुखचा किमिओ : दुर्दैवाने ही केवळ अफवा
आजच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. काही तासांत लाखो लोकांनी हा ट्रेलर बघितला. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक राजमौली यांना चित्रपटात कुठलीही कमतरता ठेवायची नाही. त्यामुळे त्यांनी यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरले आहे.