Shah Rukh Khan On Pathaan : 'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:18 PM2023-01-29T12:18:02+5:302023-01-29T12:21:51+5:30

Shah Rukh Khan On Pathaan Promotion: 'पठाण'च्या प्रमोशनसाठी शाहरूखने यावेळी अगदी वेगळा फंडा वापरला. त्याने ना मोठे प्रमोशनल इव्हेंट केलेत, ना मीडियाला मुलाखती देत सुटला. यामागे काय कारण होतं?

Shahrukh Khan Give Reply About no promotion policy Pathaan | Shah Rukh Khan On Pathaan : 'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला...

Shah Rukh Khan On Pathaan : 'पठाण'चं प्रमाेशन का केलं नाहीस? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूख खानचं उत्तर, म्हणाला...

googlenewsNext

बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमानं चारच दिवसांत २०० कोटींची कमाई केली आहे. साहजिकच एसआरके खुश्श आहे. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर माहौल केला असताना शाहरुखने ट्विटवर '#AskSRK'  या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.

चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना शाहरूखने मनमोकळी उत्तरं दिली आहेत. 'पठाण'च्या प्रमोशनसाठी शाहरूखने यावेळी अगदी वेगळा फंडा वापरला. त्याने ना मोठ मोठे प्रमोशनल इव्हेंट केलेत, ना मीडियाला मुलाखती देत सुटला. यामागे काय कारण होतं? शाहरूखने 'पठाण'चं नेहमीसारखं प्रमोशन का केलं नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडणं साहजिक आहे. #AskSRK सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरूखला नेमका हाच प्रश्न विचारला.

शाहरूखने या प्रश्नाला त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. " कुठल्याही घरगुती प्रमोशनशिवाय व रिलीजआधी एकही मुलाखत न देता पठाण धुमाकूळ घालतोय, हे कसं?", असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावर, शाहरूखने जबरदस्त उत्तर दिलं. "मैंने सोचा की शेर इंटरव्यू नहीं करते तो इस बार मैं भी नहीं करुंगा. बस जंगल में आकर देख लो," असं उत्तर शाहरूखने यावर दिलं.

"पठाण' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून कसं वाटतं? असा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"भावा नंबर तर फोनचे असतात. आम्ही फक्त आनंद साजरा करतो".

दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारलं आहे,"सर, पठाण सुपरहिट झाला... पण अद्याप सलमानची जागा घेऊ शकला नाहीत". यावर उत्तर देत एसआरके म्हणाला,"सलमान भाऊ आहे तो... ते आजकाल लोक म्हणतात ना GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम).

Web Title: Shahrukh Khan Give Reply About no promotion policy Pathaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.