पलक तिवारीने केलेल्या ड्रेस कोडच्या वक्तव्यावर शहनाज गिलचा पलटवार, म्हणाली - 'प्रमोशनदरम्यान मी…'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:06 PM2023-04-17T18:06:36+5:302023-04-17T18:07:43+5:30

Palak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच खूप चर्चेत आहे.

Shahnaz Gill hits back at Palak Tiwari's dress code statement, says - 'During the promotion I…' | पलक तिवारीने केलेल्या ड्रेस कोडच्या वक्तव्यावर शहनाज गिलचा पलटवार, म्हणाली - 'प्रमोशनदरम्यान मी…'

पलक तिवारीने केलेल्या ड्रेस कोडच्या वक्तव्यावर शहनाज गिलचा पलटवार, म्हणाली - 'प्रमोशनदरम्यान मी…'

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच खूप चर्चेत आहे. लवकरच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या टीमबरोबर या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशनदरम्यान तिने सलमान खान(Salman Khan)च्या चित्रपटाबद्दल केलेले एक वक्तव्य खूप चर्चेत आले होते. त्यानंतर आता अभिनेत्री शहनाज गिल(Shehnaaz Gill)ने प्रतिक्रिया देत पलकचे म्हणणे चुकीचे ठरवले आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिवारीने सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे शरीर नीट झाकले जाईल, असे कपडे घालायचे असा नियम असल्याचे म्हटले होते. तिचे हे वक्तव्य खूप चर्चेत आले होते. त्यानंतर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणत तिने तिच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले होते. तिच्या या वक्तव्यावर आता अभिनेत्री शहनाज गिलने प्रतिक्रिया दिली आहे.

शहनाज गिलने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी पलकने केलेल्या या वक्तव्यावर शहनाजला प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी तिने म्हटले की, असे काही नाही. प्रमोशनदरम्यान मीही शॉर्ट ड्रेसेस घातला होता.  सलमानने त्याच्या सेटवर काम करणाऱ्या मुलींसाठी कोणताही नियम बनवला नव्हता असा खुलासा शहनाजने केला आहे. 


दरम्यान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title: Shahnaz Gill hits back at Palak Tiwari's dress code statement, says - 'During the promotion I…'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.