शाहीद म्हणाला,‘ टॉमी सिंगची जर्नी होती कठीण!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 10:09 IST2016-04-27T04:39:19+5:302016-04-27T10:09:19+5:30

शाहीद कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये एका नव्या लुकमध्ये दिसतो आहे. त्याचा रॉकस्टार टॉमी सिंगचा अवतार सध्याच्या ...

Shahid said, 'Tommy Singh's Journey was difficult!' | शाहीद म्हणाला,‘ टॉमी सिंगची जर्नी होती कठीण!’

शाहीद म्हणाला,‘ टॉमी सिंगची जर्नी होती कठीण!’

हीद कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये एका नव्या लुकमध्ये दिसतो आहे. त्याचा रॉकस्टार टॉमी सिंगचा अवतार सध्याच्या युथला बेहद आवडतोय. समीक्षक, टीकाकार यांनीही त्याचा अभिनय आणि त्याच्या लुकचे स्वागतच केले आहे.

पण तो तर म्हणतोय की, त्याच्यासाठी टॉमी सिंगची भूमिका अत्यंत कठीण होती. टॉमी सिंगचा लुक स्विकारण्यापासून ते स्क्रीनवर साकारण्यापर्यंतचा टॉमीचा आणि शाहीदचा प्रवास खुप कठीण होता. त्याचे लांब केस, वाईट हावभाव, अस्सल पंजाबी लुक, त्याचा अभिनय या सर्वावर काम करण्यासाठी एक विशेष टीमच होती.

टॉमी सिंगचा मेकिंग आॅफ कसा होता याविषयीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहीदला टॉमी सिंग स्वत:मध्ये उतरवायला किती वेळ लागला याचे उत्तम सादरीकरण पहावयास मिळेल.

अभिषेक चौके दिग्दर्शित, बालाजी मोशन पिक्चर्स आणि फँटम फिल्म्स निर्मित ‘उडता पंजाब’ मध्ये आलिया भट्ट, करीना कपूर खान आणि दिलजीत दोसंग हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. चित्रपट १७ जुनला रिलीज होणार आहे.  

Web Title: Shahid said, 'Tommy Singh's Journey was difficult!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.