दीपिकासोबत का कम्फर्टेबल नाही शाहीद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 16:27 IST2016-12-11T16:27:55+5:302016-12-11T16:27:55+5:30

संजय लीला भन्साळींचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पद्मावती’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटाबद्दलची खडा न् खडा माहिती देण्याचा आमचा प्रयत्न ...

Shahid is not compatible with Deepika? | दीपिकासोबत का कम्फर्टेबल नाही शाहीद?

दीपिकासोबत का कम्फर्टेबल नाही शाहीद?

जय लीला भन्साळींचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पद्मावती’चे शूटींग सुरु झालेय. या चित्रपटाबद्दलची खडा न् खडा माहिती देण्याचा आमचा प्रयत्न  आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही जोडी या चित्रपटात दिसणार आहे, हे तुम्ही जाणताचं. भन्साळींच्या यापूर्वीच्या दोन चित्रपटात ही जोडी दिसलीयं. त्यामुळे या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांसाठी नवीन नाही. पण शाहीद कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे आणि इथेच खरी बातमी आहे. होय, दीपिकासोबत काही इन्टिमेट सीन्स शूट करण्यास शाहीदला अडचण येत असल्याचे कळतेय. दीपिकासोबत असे सीन्स देताना शाहीद कम्फर्टेबल नसल्याचे दिसतेय. आता यामागचे कारण विचाराल तर हे कारण आहे, शाहीदची पत्नी मीरा राजपूत.

 होय,तुम्ही ऐकले ते खरे आहे. या चित्रपटात शाहीद दीपिकाच्या पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र दीपिकासोबत इंटिमेट होण्याची वेळ येताच, शाहीद काहीसा अनकम्फर्टेबल होतो. ‘पद्मावती’मध्ये शाहीद व दीपिका यांच्यात अनेक रोमॅन्टिक सीन्स आणि एक लिपलॉक सीन असतील अशी अपेक्षा आहे. मात्र शाहीद हे सीन्स देण्यास मनातून तयार नाही. याचे कारण म्हणजे मीरा. शाहीदचे नवे नवे लग्न झाले आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे दीपिकासोबतचे इंटिमेट सीन्स बघून मीरा कशी रिअ‍ॅक्ट होईल, याची चिंता शाहीदला सतावते आहे. तो मीराला कुठल्याही प्रकारे दुखवू इच्छित नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामुळे शाहीदने यासंदर्भात भन्साळींशी चर्चा केली. कदाचित भन्साळींनीही शाहीदचे म्हणणे पटले असावे. कारण शाहीद कम्फर्टेबल नाही, असे काही सीन्स गाळण्यास भन्साळींनीही होकार दिला आहे. आता या बातमीने मीराला सर्वाधिक आनंद झाला नसेल तर नवल!

Web Title: Shahid is not compatible with Deepika?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.