शाहिद कपूरने चक्क एलियनसोबत केला डान्स, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 21:07 IST2018-04-08T15:36:48+5:302018-04-08T21:07:47+5:30

अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनयाबरोबरच डान्ससाठीही ओळखला जातो. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तो चक्क एका एलियनसोबत डान्स करताना बघावयास मिळत आहे.

Shahid Kapoor has done a lot of dance with the aliens, watch the video! | शाहिद कपूरने चक्क एलियनसोबत केला डान्स, पाहा व्हिडीओ!

शाहिद कपूरने चक्क एलियनसोबत केला डान्स, पाहा व्हिडीओ!

्या एलियन डान्सची क्रेझ बॉलिवूडमध्ये बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर बºयाचशा सेलिब्रेटींचे एलियनसोबत डान्स करतानाचे व्हीडिओ समोर आले आहेत. आता या यादीत अभिनेता शाहिद कपूर याचेही नाव जोडले गेले आहे. नुकतेच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. शाहिदचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहिद आपल्या मुंबईस्थित घराच्या बाल्कनीमध्ये उभा राहून एलियनसोबत डान्स कॉम्पिटीशन करताना दिसत आहे. शाहिदचा हा व्हिडीओ केवळ दोनच दिवसांमध्ये तब्बल ३३ लाख लोकांनी बघितला आहे. शाहिदच्या अगोदर अभिनेत्री यामी गौतम, टीव्ही स्टार दिव्यांका त्रिपाठी कॉमेडियन मल्लिका दुआ यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी हे एलियन चॅलेंज स्वीकारले आहे. 

दरम्यान, शाहिद कपूर अखेरीस वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. शाहिद सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव असतो. मुलगी मीशाचे तो नियमित फोटो शेअर करीत असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मीशाचे भरपूर फोटो बघावयास मिळतात. नुकताच तो पत्नी मीरा राजपूतसोबत अभिनेत्री नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ वीथ वोग’ या टॉक शोच्या फिनाले एपिसोडमध्ये सहभागी झाला होता. यावेळी नेहाने शाहिदच्या खासगी जीवनाविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले.
 

दरम्यान, ‘पद्मावत’मध्ये शाहिदचा अतिशय दमदार अभिनय बघावयास मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा शाहिदसोबत चित्रपट करू इच्छितात. त्याचबरोबर शाहिद इतरही काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त होणार आहे. दरम्यान, सध्या शाहिद आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाइम व्यतीत करीत असून, मुलींचे फोटो तो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करीत असतो. 

Web Title: Shahid Kapoor has done a lot of dance with the aliens, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.