शाहरुख दिसणार बटुकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 10:04 IST2016-11-05T19:54:37+5:302016-11-06T10:04:41+5:30
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मात्र शाहरुखला हा प्रोजेक्ट कठीण ...

शाहरुख दिसणार बटुकाच्या भूमिकेत
शाहरुख म्हणाला, ‘मी आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात आगळी वेगळी भूमिका करतोय. या चित्रपटात व्हीएफएक्सची कमाल प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे’. यावर्षीच्या सुरुवातीला शाहरुखचा ‘फॅन’ या चित्रपटात व्हीएफएक्स व जबरदस्त मेकअप पहायला मिळाला होते. यापूर्वी त्याच्या रा-वन या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर क रण्यात आला होता.
शाहरुख म्हणाला, फॅनच्या शूटिंग दरम्यान गौरवच्या भूमिके साठी मला बराच मेकअप करावा लागत होता. हे काम माझ्यासाठी फारच कठीण होते. दोघांची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धत, हावभाव सर्व काही वेगवेगळे होते.’ फॅनमध्ये शाहरुखचा डबल रोल होता. एकीकडे तो सुपरस्टार होता तर दुसºया भूमिकेत त्याचा डाय हार्ड फॅ न म्हणून भूमिका साकारली होती. आनंद एल. रायच्या आगामी चित्रपटात शाहरुख एका ‘बटुका’च्या भूमिकेत दिसणार आहे. आता आनंद एल रायच्या चित्रपटात पुन्हा एकदा व्हीएफएक्सच्या माध्यमातून तो काहीतरी नवे करताना दिसणार आहे. यामुळेच त्याला हा चित्रपट कठीण वाटू लागलाय.
या चित्रपटात शाहरुखच्या अपोझिट कंगना राणौतचे नाव फायनल करण्यात आले होते, मात्र आता कॅटरिना कैफच्या नावाची चर्चा सुरू आहे. आनंद यांना ‘तनू वेड्स मनू’च्यावेळी कंगनाचे नखरे सहन करावे लागले होते. यामुळे यावेळी कॅटरिनाच्या नावाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅटरिनाने या प्रोजेक्टसाठी आपली संमती दिली असल्याचे सांगण्यात येते.