​ सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ने मोडला शाहरूख खानचा हा विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 13:52 IST2017-03-22T08:22:34+5:302017-03-22T13:52:34+5:30

अभिनेता सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सध्या हा चित्रपट चर्चेत आहे, तो एका विक्रमामुळे. ...

Shah Rukh Khan's breakthrough by Salman Khan's 'Tubulite'! | ​ सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ने मोडला शाहरूख खानचा हा विक्रम!

​ सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ने मोडला शाहरूख खानचा हा विक्रम!

िनेता सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सध्या हा चित्रपट चर्चेत आहे, तो एका विक्रमामुळे. होय, कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ने प्रदर्शनापूर्वीच एक विक्रम स्थापन केला आहे. या चित्रपटाचे सर्व अधिकार १३२ कोटी रूपयांना विकले गेले आहेत. आॅल इंडिया डिस्ट्रिब्यूशनने ‘ट्यूबलाईट’चे सर्व अधिकार  एनएच स्टूडिओला १३२ कोटी रुपयांत विकले आहेत. म्हणजेच रिलीजपूर्वीच ‘ट्यूबलाईट’ शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तेही किंगखान शाहरूख खान याच्या ‘दिलवाले’ चित्रपटाचा विक्रम मोडीत काढते. याआधी शाहरुखच्या ‘दिलवाले’चे सगळे हक्के विक्रमी १२५ कोटी रुपयांमध्ये विकले होते. आता ही जागा ‘ट्यूबलाईट’ने घेतली आहे. एकंदर काय, तर रिलीजपूर्वी ‘ट्यूबलाईट’ने कमाईचा एक विक्रम केलाच.  रिलीजनंतर बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट कमाईचे आणखी किती विक्रम करतो,  हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

ALSO READ : ‘ट्युबलाईट’च्या क्लायमॅक्सवरून सलमान का पेटला हट्टाला?

 दिग्दर्शक कबीर खानचा सलमानसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले होते.   मध्यंतरी कबीर खान व सलमानमधील मतभेदाच्या सेटवर भांडणे होत असल्याच्या बातम्या येऊन धडकल्या होत्या. पण आता हे मतभेद निवळल्याचे कळतेय. ‘ट्यूबलाईट’मध्ये सलमानच्या अपोझिट दिसणार आहे ती चीनी अभिनेत्री झू झू.  सदरील चित्रपट १९६२ साली झालेल्या चीन युद्धावर आधारित असून सलमान खानचे पात्र एका चीनी मुलीच्या प्रेमात पडते अशी कथेची मांडणी सांगितली जातेय. य  चीनी अभिनेत्री झु झु या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड डेब्यू करतेय. सलमानचा भाऊ सोहेल खानसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.
 

Web Title: Shah Rukh Khan's breakthrough by Salman Khan's 'Tubulite'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.