रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:03 PM2022-06-14T18:03:00+5:302022-06-14T18:03:51+5:30

Bramhastra Movie: रणबीर कपूर-आलिया भटचा बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खानही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.

Shah Rukh Khan will be seen in Ranbir-Alia's 'Brahmastra' | रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत

रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt)चा बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' (Bramhastra) या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अयान मुखर्जी (Ayan Mukharjee) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjun) तसेच मौनी रॉय (Mouni Roy) देखील दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान(Shah Rukh Khan)चीही महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. शाहरुख खानच्या भूमिकेबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. तरी तो चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, "ब्रह्मास्त्रची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की प्रत्येक अभिनेता कथेत महत्त्वाची भूमिका बजावतो. रणबीरचे पात्र प्रत्येकाला ब्रह्मास्त्राच्या शोधात वेगवेगळ्या वेळी भेटते. जिथे नागार्जुन एक पुरातत्वशास्त्रज्ञ आहे. तर शाहरूख खान एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागार्जुन, शाहरुख खान आणि डिंपल कपाडिया कथेच्या वेगवेगळ्या भागात रणबीरच्या पात्राला मदत करतात आणि अशा प्रकारे कथा पुढे सरकते. त्यांच्या सर्वांकडे रणबीरला ब्रह्मास्त्रापर्यंत नेण्याचे संकेत आहेत. चित्रपटाची सुरुवात शाहरुखच्या अनुक्रमाने होते. लांबलचक सीक्‍वेन्‍स आणि शाहरुखने या वर्षाच्या सुरुवातीला फिल्मसिटीमध्‍ये दहा दिवसांत तो शूट केला. आलिया आणि रणबीरच्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे, नुकतेच विशाखापट्टणम येथे आलेले रणबीर आणि अयान मुखर्जी यांचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आणि त्यांच्या आवडत्या स्टार्सवर फुलांचा वर्षावही केला. हा चित्रपट ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shah Rukh Khan will be seen in Ranbir-Alia's 'Brahmastra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.