शाहरूख खानने मान्य केल्या राज ठाकरेंच्या या अटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:50 IST2016-12-12T11:31:55+5:302016-12-12T12:50:36+5:30

किंगखान शाहरूख खान याचा ‘रईस’ हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार आहे.  मात्र त्यापूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनात कुठलेही विघ्न नकोत, यासाठी ...

Shah Rukh Khan accepted Raj Thackeray's terms ... | शाहरूख खानने मान्य केल्या राज ठाकरेंच्या या अटी...

शाहरूख खानने मान्य केल्या राज ठाकरेंच्या या अटी...

ंगखान शाहरूख खान याचा ‘रईस’ हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार आहे.  मात्र त्यापूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनात कुठलेही विघ्न नकोत, यासाठी शाहरूख कामाला लागल्याचे चित्र आहे. होय, काल रविवारी शाहरूखने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची  त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशीही बोलले. भारतातील ‘रईस’च्या प्रमोशनमध्ये माहिरा खानचा कुठलाही सहभाग नसेल, विशेषत: हे सांगण्यासाठी शाहरूख आपल्याला भेटायला आला होता, असे राज यांनी सांगितले.

‘रईस’मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोनच महिन्यांपूर्वी मनसेने पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट देशात चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी ‘रईस’ विरूद्ध ठाम भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. ‘रईस’ला विरोध होणार याची कुणकुण कदाचित शाहरूखला लागली असावी. त्याआधीच तो कृष्णकुंजवर पोहोचला. ‘रईस’चे प्रोड्यूसर रितेश यांनी राज यांना अनेकदा भेटीसाठी वेळ मागितला होता. पण राज यांनी त्यास नकार दिला होता. अखेर शाहरूखला राज ठाकरे यांची भेट मिळाली. सूत्रांच्या मते, यासाठी सलमानने शाहरूखला मदत केली.  



 महिरा खानमुळे चित्रपटाला कुठल्याही प्रकारे विरोध करू नये,असा या भेटीमागचा शाहरूखचा स्पष्ट उद्देश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख व राज ठाकरे यांच्यात यावेळी बराच वेळ चर्चा झाली. याआधी मनसेने करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका होती. हा वाद चांगलाच विकोपाला गेला होता. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. या मध्यस्थीवरून मुख्यमंत्री अडचणीतही सापडले होते. दरम्यान, शाहरुखला कुणालाही भेटण्याची गरज नाही. त्याच्या चित्रपटाला कुणी विरोध केला तर आम्ही चित्रपटगृहाला संरक्षण देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Shah Rukh Khan accepted Raj Thackeray's terms ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.