सात वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 13:28 IST2018-03-14T07:52:22+5:302018-03-14T13:28:36+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनवरुन गायब असलेली ईशा देओल कॅमबॅक करण्यासाठी तयार आहे. एका हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये ती दिसणार ...

Seven years later, 'this' actress will makeback | सात वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक

सात वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक

ल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनवरुन गायब असलेली ईशा देओल कॅमबॅक करण्यासाठी तयार आहे. एका हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये ती दिसणार आहे. केकवॉक असे त्या शॉर्ट फिल्मचे नाव आहे. याचे दिग्दर्शन राम कमल मुखर्जी करणार आहे. राम कमल यांनी हेमा मालिनी यांची बायॉग्राफी लिखिली आहे. 

ईशा या चित्रपटात एका शेफची भूमिका साकारणार आहे.याचित्रपटाबाबत नवभारत टाईम्सशी बोलताना ईशा म्हणाली, राम कमल यांच्या डोक्यात हा विचार तेव्हा आला ज्यावेळी ते माझ्या आईच्या आयुष्यावर आधारित पुस्तकासाठी माझा इंटरव्हु करत होते. तर राम कमल या चित्रपटाविषयी म्हणाला की, ईशानेच मला या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. चित्रपटाची कथा आणि स्क्रिनप्ले सुद्धा राम कमलच लिहिणार आहे.  



ईशाने कोई मेरे दिल से पूछे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘एलओसी कारगिल, युवा, धुम, आँखे आणि कॅश यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईशा गेल्या दोन्ही ‘रोडीज एक्स-२’मध्ये जजच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. याव्यतिरिक्त ती २०१५ मध्ये आलेल्या ‘किल देम यंग’ नावाच्या ड्रामा फिल्ममध्ये बघावयास मिळाली होती. तसेच २०११ मध्ये मम्मी हेमामालिनी यांच्या ‘टेल मी ओ खुदा’ या चित्रपटातही झळकली होती. २०१२च्या फेब्रुवारीमध्ये ईशाने उद्योगपती भरत तख्तानीसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यातच जूनमध्ये त्या दोघांनी लग्न केले होते. 2017मध्ये ईशाने राध्या नावाची गोंडस मुलीला जन्म दिला होता. लग्नानंतर ईशाने इंडस्ट्रीत राहण्यास फारसा उत्साह दाखविला नाही. 

काही महिन्यांपूर्वी  दिवसांपूर्वी ईशाने आपल्या मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला ईशाने कॅप्शन सुद्धा दिले होते की, ‘स्नो डेच्या आठवणी, माझ्या प्रेमळ व्यक्तीसोबत माझे सुंदर जग’ दरम्यान, मुलीच्या जन्माअगोदर ईशाने बेबी बम्पसह अनेक फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरलही झाले होते. ईशाने २० आॅक्टोबर २०१७ रोजी मुलगी राध्याला जन्म दिला. 

Web Title: Seven years later, 'this' actress will makeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.