​पाहा, कन्नडमधील ‘झिंगाट’ अन् पुन्हा व्हा ‘झिंग झिंग झिंगाट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 09:40 IST2017-03-26T04:10:07+5:302017-03-26T09:40:07+5:30

केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला आपल्या तालावर नाचवणारे ‘झिंगाट’ या मराठी गाण्याचे कन्नड व्हर्जन अर्थात कन्नड गाणे रिलीज झाले आहे.

See, 'Zingat' and 'Zing Zing Zangat' in Kannada! | ​पाहा, कन्नडमधील ‘झिंगाट’ अन् पुन्हा व्हा ‘झिंग झिंग झिंगाट’!!

​पाहा, कन्नडमधील ‘झिंगाट’ अन् पुन्हा व्हा ‘झिंग झिंग झिंगाट’!!

वळ महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला आपल्या तालावर नाचवणारे ‘झिंगाट’ या मराठी गाण्याचे कन्नड व्हर्जन अर्थात कन्नड गाणे रिलीज झाले आहे.  ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटातील गाण्यानी सगळ्यांना ‘याड’ लावल. कन्नड चित्रपटातील हे कन्नड गाणेही तुम्हाला असचं ‘याड’ लावणार. सध्या कन्नडमधील या  ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  भाषा कळत नसली तरी त्यातील भावना तुम्हाला ठेका धरायला भाग पाडणार यात शंका नाही.



नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचा कन्नड रिमेक लवकरच रिलीज होतो आहे. ‘मनसु मल्लिगे’ असे या कन्नड रिमेकचे नाव आहे. ‘सैराट’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु ही ‘मनसु मल्लिगे’मध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. तर रिंकूसोबतच अभिनेता सत्यप्रकाश यांचा मुलगा निशांत दिसणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले होते.  

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर रिंकू पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावणार, असेच दिसतेय. ‘मनसु मल्लिगे’ मध्ये मराठी ‘सैराट’चे संगीत काही बदल न करता तसंच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा झिंगाट होताना दिसतील. ‘मनसु मल्लिगे’  या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश यांची आहे. ‘सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने विकत घेतले असून  हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. लवकरच ‘सैराट’चा हिंदी रिमेक सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


 

Web Title: See, 'Zingat' and 'Zing Zing Zangat' in Kannada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.