SEE PIC : आपल्या जुळ्या मुलांना बघण्यासाठी करण जोहर पोहचला हॉस्पिटलमध्ये!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 14:14 IST2017-03-25T08:42:45+5:302017-03-25T14:14:32+5:30
दिग्दर्शक करण जोहर याला काल सायंकाळी मुंबई येथील एका हॉस्पिटलच्या बाहेर बघण्यात आले होते. याठिकाणी करण त्याची जुळी मुले ...

SEE PIC : आपल्या जुळ्या मुलांना बघण्यासाठी करण जोहर पोहचला हॉस्पिटलमध्ये!!
द ग्दर्शक करण जोहर याला काल सायंकाळी मुंबई येथील एका हॉस्पिटलच्या बाहेर बघण्यात आले होते. याठिकाणी करण त्याची जुळी मुले यश आणि रुही यांना भेटण्यासाठी आला होता. काही दिवसांपूर्वीच करण सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. मात्र प्रीबर्थमुळे मुलांना दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रानुसार आता दोन्ही मुलांची प्रकृती ठणठणीत असून, करण लवकरच त्यांना घरी घेऊन जाण्याची शक्यता आहे.
![]()
काही दिवसांपूर्वीच करणने ट्विटरवर जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे जाहीर केले होते. परंतु प्रीबर्थमुळे या मुलांना डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्येच काही दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या दोन्ही मुलांची तब्येत ठणठणीत असून, करण या महिन्याच्या अखेरीस घरी घेऊन जाण्याची शक्यता आहे. परंतु याविषयी अद्यापपर्यंत डॉक्टरांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली गेली नाही. मात्र, करण त्याच्या या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास खूपच उत्सुक आहे. शिवाय त्याचे फॅन्सही करणकडून मुलांसोबतचे अनुभव ऐकण्यास उत्सुक आहेत.
![]()
![]()
दरम्यान, काल सायंकाळी करणचे हॉस्पिटलमधील जे फोटोज् समोर आले त्यावरून तो फोटो काढण्यास अजिबात उत्सुक नसल्याचे दिसून आला. तो तातडीने हॉस्पिटलमध्ये जात होता. मुलांची ओढ लागल्याने तो बेचैन झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्याने लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. करणने त्याच्या जुळ्या मुलांचे नावे यश आणि रुही असे ठेवले आहे. करण सध्या वडील होण्याचे सर्व कर्तव्य पार पाडू इच्छितो. त्याने सोशल मीडियावर ही बातमी सांगताना त्याबाबत स्पष्टही केले होते.
![]()
![]()
यावेळी करणने त्याच्या हितचितंक आणि मित्रपरिवाराचे आभार मानताना म्हटले होते की, मी एक चांगला पिता होण्याचे सर्व कर्तव्य पार पाडणार आहे. यावेळी तो खूपच भावुक झाल्याचे बघावयास मिळाले. त्याने सरोगेट आणि संबंधित डॉक्टरांची आभार मानले होते. त्याचबरोबर मेडिकल सायन्सचेही आभार व्यक्त केले होते. आता करण त्याच्या मुलांना घरी घेऊन जाऊ इच्छित आहे.
ALSO READ : Photo Viral : पहा करण जोहरच्या जुळ्या मुलांची पहिली झलक?