SEE PIC : करण जोहरच्या मुलांना बघायला पोहोचले आमिर खान आणि किरण राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 19:38 IST2017-04-02T14:08:12+5:302017-04-02T19:38:12+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या जुळ्या मुलांमुळे चांगलाच चर्चेत आहे. करणने नुकतेच त्याच्या मुलांना हॉस्पिटलमधून घरी नेले ...

SEE PIC: Aamir Khan and Kiran Rao reach Karan Johar's children! | SEE PIC : करण जोहरच्या मुलांना बघायला पोहोचले आमिर खान आणि किरण राव!

SEE PIC : करण जोहरच्या मुलांना बघायला पोहोचले आमिर खान आणि किरण राव!

लिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या जुळ्या मुलांमुळे चांगलाच चर्चेत आहे. करणने नुकतेच त्याच्या मुलांना हॉस्पिटलमधून घरी नेले असून, त्याच्या मुलांना भेटण्यासाठी बॉलिवूडच्या तारे-तारकांची अक्षरश: रीघ लागत आहे. गेल्या शनिवारी मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी करणच्या घरी हजेरी लावत मुलांची भेट घेतली. 



गेल्या २९ मार्च रोजी करणने त्याच्या मुलांना हॉस्पिटलमधून घरी नेले होते. मुलांना घरी घेऊन पोहोचताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन हे करणला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. या अगोदर शाहिद कपूर, रणबीर कपूर, शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी करणचे भेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी करणने त्याच्या मुलांच्या रुमचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले होते. करणच्या मुलांच्या या रुमचे (नर्सरी) डिझाइन त्याची जवळची मैत्रीण गौरी खान हिने केले होते. 



करणची जुळी मुले यश आणि रुही यांचा जन्म ७ फेब्रुवारी रोजी झाला होता. प्री-बर्थमुळे त्यांना जवळपास ५० दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. करणने त्याच्या जुळ्या मुलांचे नाव त्याच्या आई-वडिलांच्या नावे ठेवले आहेत. सध्या हे चिमुकले घरी आले असून, त्यांना भेटण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीमधून सेलेब्सची रीघ लागत आहे. करणनेदेखील मुलांच्या देखभालीसाठी सहा महिन्यांचा ब्रेक घेतल्याने तोदेखील मुलांचा सहवास सध्या एन्जॉय करीत आहे. 

Web Title: SEE PIC: Aamir Khan and Kiran Rao reach Karan Johar's children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.