बघा: ‘सरकार3’चा फर्स्ट लूक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 18:33 IST2016-10-17T18:18:16+5:302016-10-17T18:33:55+5:30

राम गोपाल वर्मा यांच्यासाठी हे वर्ष फारसे यशाचे ठरले नाही. पण तुम्ही काहीही म्हणा, राम गोपाल वर्मा जे काही ...

See: First Look of 'Government3' ... | बघा: ‘सरकार3’चा फर्स्ट लूक...

बघा: ‘सरकार3’चा फर्स्ट लूक...

म गोपाल वर्मा यांच्यासाठी हे वर्ष फारसे यशाचे ठरले नाही. पण तुम्ही काहीही म्हणा, राम गोपाल वर्मा जे काही करतात, ते स्टाईलमध्ये करतात. त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकार3’बद्दलही असेच म्हणता येईल. चित्रपटातील प्रत्येक कलाकारासोबत राम गोपाल वर्मा यांनी एकत्र भेट घालून दिली. ती सुद्धा एक नाही, दोन- दोन , तीन तीन लूकसह. तब्बल ८ वर्षांनंतर सुपरहिट ‘सरकार’चा तिसरा पार्ट येतो आहे. तेही सहा सुपरस्टार्ससह. अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोनित राय, अमित साध, रोहिणी हट्टंणी आणि यामी गौतम अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘सरकार3’चा फर्स्ट लूक तुम्हीही बघा तर..



‘सरकार3’मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची भूमिका नसेल. कारण चित्रपटाचे सेटअप एकदम वेगळे आहे. यात अमिताभ एकदम नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
अमित साध चित्रपटात अमिताभ यांचा नातू दाखवला आहे. अमित साध केकेचा मुलगा आहे. तो प्रचंड जिद्दी आणि गरम रक्ताचा, रागीट दाखवण्यात आलाय.
चित्रपटात रोनित राय हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव गोकुल साटम दाखवण्यात आले आहे.
मनोज वाजपेयी याला राम गोपाल वर्मा यांनीच ‘सत्या’मधून ब्रेक दिला होता. मनोज वाजपेयीची भूमिका अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे.  
यामी गौतम या चित्रपटात अनु करकरेची भूमिका साकारते आहे. बदला आणि बदला हेच अनुचे लक्ष्य असते.
जॅकी श्रॉफ चित्रपटाचे पहिले विलेन आहेत. जॅकीला या चित्रपटात सर्वजण सर म्हणून बोलवताना दिसणार आहे.
रोहिणी  हट्टंगडी  यांनीही या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली आहे.
 

Web Title: See: First Look of 'Government3' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.