​सुजित आणणार सत्यजित रेंचा ‘फेलुदा’ हिंदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 12:03 IST2016-09-10T06:22:55+5:302016-09-10T12:03:13+5:30

जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘फेलुदा’ सिरीजवर हिंदी चित्रपट काढण्याचा विचार सध्या ‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’ फेम दिग्दर्शक ...

Satyajit Ray's 'Feluda' in Hindi | ​सुजित आणणार सत्यजित रेंचा ‘फेलुदा’ हिंदीत

​सुजित आणणार सत्यजित रेंचा ‘फेलुदा’ हिंदीत

प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘फेलुदा’ सिरीजवर हिंदी चित्रपट काढण्याचा विचार सध्या ‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’ फेम दिग्दर्शक सुजित सरकार करत आहे.

तो म्हणतो, ‘फेलुदा सिरीजमधील ‘सोनार केला’ या चित्रपटाला हिंदीमध्ये सादर करण्याचे माझे स्वप्न आहे. ज्या हतोटीने सत्यजित रेंनी हे पात्र लिहिले आहे, खरंच सलाम आहे त्यांना. आतापर्यंत आपण पाश्चिमात्य डिटेक्टिव्ह स्टोरीजच पाहिल्या आहेत. ‘फेलुदा’ ही खरी आपली अस्सल भारतीय डिटेक्टिव्ह गोष्ट आहे. त्यावर चित्रपट काढणे मला खरंच खूप आवडेल.’

पण हा चित्रपट कधी येणार याबाबत मात्र तो साशंक आहे. तो म्हणतो, अद्याप मी कथेचे हक्क मिळवलेले नाहीत. त्यामुळे चित्रपटावर कधी काम सुरू होईल हे सांगणे अवघड आहे. मी सध्या विविध स्क्रीप्टस्चे वाचन करत असून ‘१९११’ या चित्रपटाची पटकथादेखील लिहित आहे.’

देसी शेरलॉक होल्मस्’असेसुद्धा फेलुदाचे वर्णन करतात. १९६५ साली सर्वप्रथम रे यांनी ‘संदेश’ या बंगाली मॅगझीनमध्ये फेलुदा सिरीज प्रकाशित केली होती.

Feluda sketch

Web Title: Satyajit Ray's 'Feluda' in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.