बाबा बर्फानीच्या रंगात भक्तीमय झाली सारा अली खान, अमरनाथ यात्रेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:46 PM2023-07-21T12:46:18+5:302023-07-21T12:49:00+5:30

रा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Sara ali khan visits amarnath temple in jammu and kashmir video viral netizens praises her | बाबा बर्फानीच्या रंगात भक्तीमय झाली सारा अली खान, अमरनाथ यात्रेचा व्हिडीओ व्हायरल

बाबा बर्फानीच्या रंगात भक्तीमय झाली सारा अली खान, अमरनाथ यात्रेचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेयं. अलिकडेच अभिनेत्रीने सोनमर्गमध्ये काही फोटो शेअर केले होत. काश्मीरमध्ये ती लहान मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. यादरम्यान सारा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सारा अमरनाथ यात्रेत गेल्याचे दिसतेय. सारा अली खानचा हा व्हिडीओ ANI ने ट्विटवर शेअर केला आहे      

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की सारा अली खान अमरनाथ यात्रेत सहभागी झाली आहे. तिला यात्रेकरुन घेरलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ANI ने कॅप्शनमध्ये लिहिले, ''अभिनेत्री सारा अली खानने जम्मू-कश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा केली.'' व्हिडीओमध्ये सारा अली खान ब्ल्यू रंगाचं जॅकेट आणि मॅचिंग पँट घातलेली दिसतेय. 
साराच्या या व्हिडीओ चाहते सतत्याने कमेंट करत आहे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, सारा अली खान शेवटची 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसली होती.  या सिनेमात तिने विकी कौशलसोबत स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली होती. लवकरच ती अनुराग बसूच्या 'मेट्रे इन दिनों'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खरे आणि अली फजल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  


 अली खानकडे 'ए वतन मेरे वतन' देखील आहे, जो सत्य घटनावर आधरित आहे. एका बॉम्बे कॉलेज तरुणीची क्रांतिकारी कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्रीने 2018 मध्ये रिलीज झालेल्या सुशांत सिंगच्या 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा', 'लव्ह आज कल 2', 'कुली नंबर 1', 'अतरंगी रे' आणि 'गॅसलाइट'मध्ये दिसली.
 

Web Title: Sara ali khan visits amarnath temple in jammu and kashmir video viral netizens praises her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.