संजय दत्तच्या बायोपिकने रिलीज आधीच कमावले तब्बल 110 कोटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 12:03 IST2018-02-22T06:33:39+5:302018-02-22T12:03:39+5:30

संजय दत्तचा बायोपिक हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव संजू ठेवण्यात आल्याची चर्चा आहे मात्र मेकर्सनी ...

Sanjay Dutt's biopic has already earned a whopping 110 crore! | संजय दत्तच्या बायोपिकने रिलीज आधीच कमावले तब्बल 110 कोटी !

संजय दत्तच्या बायोपिकने रिलीज आधीच कमावले तब्बल 110 कोटी !

जय दत्तचा बायोपिक हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव संजू ठेवण्यात आल्याची चर्चा आहे मात्र मेकर्सनी अजून हे नाव फायनल केलेले नाही. आता चित्रपटाशी संबंधीत आणखीन एक नवी माहिती समोर आली आहे.  

2 वर्षांच्या कालावधीत तयार झालेल्या या चित्रपटाला वर्ल्डवाईड डिस्ट्रिब्यूशचे राईट्स फॉक्स स्टार स्टुडिओने 110 कोटींना विकत घेतले आहे. त्यामुळे चित्रपटाने रिलीज आधीच 110 कोटींची कमाई केली आहे. 

रिपोर्टनुसार चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमीत कमी 190 कोटींची कमाई करावी लागणार आहे. तर विदेशात निदान 45 कोटींचा गल्ला जमवावा लागणार आहे. रणबीर कपूरच्या करिअरमधला हा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे.  

ALSO READ :  संजय दत्तवरील बायोपिकचे टायटल अखेर निश्चित; ‘या’ नावावर केला शिक्कामोर्तब!

प्रेक्षकही या चित्रपटाच्या रिलीजची वाट बघतायेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या सेटवरून संजय दत्तच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरचे जेवढे फोटो समोर आले आहेत, त्या सर्व फोटोंमध्ये तो खूपच इम्प्रेसिंग दिसत आहे. हि भूमिका साकाराण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. रणबीरसह यात  विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बायोपिकमध्ये रणबीर कपूर तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. एक म्हणजे, संजय दत्तचा बॉलिवूड डेब्यू, मग त्याला लागलेले ड्रग्सचे व्यसन आणि नंतर तुरुंगातील शिक्षा. चित्रपटात संजयचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल तर आई नर्गिसच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोईराला दिसणार आहे.मेकर्सनी चित्रपटातील प्रत्येक पात्र विचारापूर्वक निवडले आहे. त्यामुळे स्टारकास्टची नाव फायनल करायला मेकर्सना खूपवेळ लागला.  चित्रपटात महेश भट्ट आणि संजय दत्त हेदेखील गेस्ट अपियरेंस करताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला विधू विनोद चोपडा प्रोड्यूस करीत आहेत. चित्रपट 29 जून 2018 मध्ये रिलीज होणार आहे. 

Web Title: Sanjay Dutt's biopic has already earned a whopping 110 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.