​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीचा असेल किमिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 19:53 IST2017-01-20T14:23:39+5:302017-01-20T19:53:39+5:30

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी संजय दत्तच्या बायोपिकची चांगलीच चर्चा सुरू आहे. यात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. ...

Sanjay Dutt will be the actress in the biopic! | ​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीचा असेल किमिओ!

​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीचा असेल किमिओ!

ग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी संजय दत्तच्या बायोपिकची चांगलीच चर्चा सुरू आहे. यात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. संजय दत्तने आपल्या करिअरमध्ये ज्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे, अशा अभिनेत्रीच्या भूमिका साकारण्यासाठी आजच्या पिढीतील अनेक बॉलिवूड स्टार्स उताविळ असल्याचे दिसते. सोनम कपूर, दिया मिर्झा पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली आहे. 

सध्या व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार या चित्रपटात अनुष्का शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. असे सांगण्यात येते की ती या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अनुष्का शर्माला आवडली असून, राजकुमार हिरानी यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार दिला आहे. अनुष्काची या चित्रपटातील भूमिका लहान असली तरी दमदार असल्याचे सांगण्यात येते. Read More : संजूबाबाच्या बायोपिकमध्ये सोनम बनणार माधुरी?



दरम्यान असेही सांगण्यात येत आहे की, अनुष्का शर्मा हिने या चित्रपटाची शूटिंग सुरू केली असून, आणखी चार पाच दिवस हे शूटिंग सुरू राहणार आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा कोणत्या भूमिकेत दिसेल याचा खुलासा करण्यात आलेला नाही. ती यासाठी उत्साहित असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय दत्तच्या खºया आयुष्यातही अनेक अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो. हा देखील या चित्रपटातील महत्त्वाचा भाग असणार आहे. अशा वेळी अनुष्का अशा अभिनेत्रींची भूमिका साकारत आहे, जिचे नाव संजय दत्तसोबत जोेडले गेले आहे, मात्र या केवळ चर्चा आहेत. Read More : या कारणामुळे संजय दत्त करतोय रणबीर कपूरला दुर्लक्ष



राजकुमार हिराणी आणि संजय दत्त यांच्यात चांगली मैत्री असल्याचे सांगण्यात येते. या शिवाय संजय दत्तसोबत राजकुमार हिरणी यांने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘लगे रहो मुन्नाभाई’ यासारखे चित्रपट केले आहेत. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटातही संजय दत्त याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानंतर तो संजय दत्त सोबत ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ या मुन्नाभाई सिरीजच्या तिसºया चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल करणार आहेत. यात सोनम कपूर कोणती भूमिका साकारेल हे देखील गुलदस्त्यात आहे. 

ALSO READ : 
मर्द बनो : संजय दत्तचा रणबीरला सल्ला
संजय दत्तच्या मुलीच्या रुपात दिसणार सायशा सहगल

Web Title: Sanjay Dutt will be the actress in the biopic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.