संजय दत्तची लेक त्रिशाला मेकअपशिवाय दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 15:08 IST2017-07-11T09:38:02+5:302017-07-11T15:08:02+5:30
संजय दत्तची लाडकी लेक त्रिशाला दत्त म्हणजे ग्लॅमरस गर्ल. त्रिशालाने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेले नाही. पण त्रिशालाची स्टाईल, तिचे राहणीमान कुठल्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्याचमुळे तिचे ग्लॅमरस लाईफ चर्चेचा विषय ठरते. असे ग्लॅमरस आयुष्य जगणा-या त्रिशालाने इन्स्टाग्रामवर आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे.

संजय दत्तची लेक त्रिशाला मेकअपशिवाय दिसते अशी!
स जय दत्तची लाडकी लेक त्रिशाला दत्त म्हणजे ग्लॅमरस गर्ल. त्रिशालाने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेले नाही. पण त्रिशालाची स्टाईल, तिचे राहणीमान कुठल्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्याचमुळे तिचे ग्लॅमरस लाईफ चर्चेचा विषय ठरते. असे ग्लॅमरस आयुष्य जगणा-या त्रिशालाने इन्स्टाग्रामवर आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. होय, कारण हा त्रिशालाचा ‘ओरिजनल’ फोटो आहे. होय, ओरिजनल! कारण यात त्रिशालाने मेकअप केलेले नाही. विना मेकअपमधील या फोटोत त्रिशाला एकदम वेगळी दिसतेय. अर्थात तिची ‘नॅचरल ब्युटी’ वेड लावणारी आहे. सोमवारी सकाळी त्रिशालाने तिचा हा फोटो पोस्ट केला आणि आत्तापर्यंत त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
ALSO READ : सावत्र आई मान्यता दत्तचा रेड बिकिनीतील फोटो बघून त्रिशालाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!
त्रिशाला ही संजय दत्तची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. १९८९मध्ये संजयने रिचा शर्मा हिच्याशी पहिले लग्न केले. रिचा व संजयला एक मुलगी झाली. तीच त्रिशाला. रिचाचा ब्रेन ट्युमरमुळे १९९६ मध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून त्रिशाला आपल्या आजी-आजोबांकडे अमेरिकेत राहते. रिचाच्या मृत्यूनंतर १९९८ मध्ये संजयने रिया पिल्लई हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. मात्र २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर २००८ मध्ये संजयने मान्यताशी तिसरा विवाह केला.
त्रिशाला कायम आपले हॉट व सेक्सी फोटो शेअर करताना दिसते. मध्यंतरी त्रिशाला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, अशीही चर्चा होती. अर्थात ही चर्चा केवळ चर्चाच ठरली. संजय दत्त त्रिशालावर प्रचंड प्रेम करतो. संजयची तिसरी पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबतही त्रिशालाचे चांगले बॉन्डिंग आहे. अलीकडे मान्यताच्या इन्स्टाग्राम फोटोंची त्रिशाला मनापासून प्रशंसा करताना दिसली होती.