सलमानला वाटते, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व्हाव्या हिलेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 09:51 IST2016-11-05T21:17:50+5:302016-11-06T09:51:31+5:30
बॉलिवूडस्टार सलमान खानला अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी हिलेरी क्लिंटन यांची निवड व्हावी असे वाटू लागले आहे. त्याने हिलेरी क्लिटंन यांना विजयी ...

सलमानला वाटते, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष व्हाव्या हिलेरी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलेरी क्लिंटन व डोनाल्ट ट्रम्प यांच्यात चुरस लागली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण जिंकणार याची चर्चा जगात सर्वत्र सुरू आहे. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. जगातील काही राष्ट्रे हिलेरी क्लिटंन यांना पाठिंबा देत आहेत तर काहींना ट्रम्प राष्ट्रपती व्हावे असे वाटते. यात समलान खाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
सलमान खानने शनिवारी सायंकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हिलेरी क्लिंटनचा फोटो पोस्ट करून आपले समर्थन असल्याचे मत व्यक्त केलेय. यापोस्टमध्ये त्याने हिलरीचे नाव लिहले असून ‘तुम्ही विजयी व्हावे’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. सोबनतच त्याने ‘देव तुम्हाला संविधान व मानवतेचे रक्षण करण्याची शक्ती देवो’ असेही लिहले आहे.
अमेरिकेत भारतीय मतदारांची संख्या बरीच मोठी आहे. एनआरआय बॉलिवूड चित्रपटातील कलाकारांचे चाहते आहेत. यामुळेच बॉलिवूडस्टार्सची मते अमेरिकेत निवडणुकीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी देखील स्टार्सनी आपला पाठिंबा हिलरी क्लिटंनला जाहीर केला आहे. याच पाश्वभूमीवर सलमान खानने हिलेरी क्लिंटनला जाहीर केलेला पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.
Hope you win. May god give you the strength to follow the constitution and human values. All the best.#HillaryClintonforpresidentpic.twitter.com/lelPESTHEK— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 5, 2016}}}} ">http://
}}}} ">Hope you win. May god give you the strength to follow the constitution and human values. All the best.#HillaryClintonforpresidentpic.twitter.com/lelPESTHEK— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 5, 2016
Hope you win. May god give you the strength to follow the constitution and human values. All the best.#HillaryClintonforpresidentpic.twitter.com/lelPESTHEK— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 5, 2016
सलमान खानने त्याच्या आगामी ट्युबलाईट चित्रपटाचे शूटिंग शेड्युअल पूर्ण केले असून तो बिग बॉसच्या 10व्या सिझनचे संचालन करीत आहे. सलमानच्या या शोचे अमेरिकेतही बरेच चाहते असल्याचे सांगण्यात येते.