सलमान खानच्या 'किक 2' मध्ये या हॉट अभिेनत्रीची झाली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:41 IST2018-02-21T10:11:20+5:302018-02-21T15:41:20+5:30

काही दिवसांपूर्वीच साजिद नडियाडवाला यांचा आगामी 'किक 2' चित्रपटाची अनाउंसमेंट करण्यात आली आहे. या चित्रपटात सलमान खान अॅक्शन करताना ...

Salman Khan's 'Kick 2' entry for Hot Hotrunti | सलमान खानच्या 'किक 2' मध्ये या हॉट अभिेनत्रीची झाली एंट्री

सलमान खानच्या 'किक 2' मध्ये या हॉट अभिेनत्रीची झाली एंट्री

ही दिवसांपूर्वीच साजिद नडियाडवाला यांचा आगामी 'किक 2' चित्रपटाची अनाउंसमेंट करण्यात आली आहे. या चित्रपटात सलमान खान अॅक्शन करताना दिसणार आहे. अजून या चित्रपटात सलमानच्या अपोझिट कोण अभिनेत्री असणार हे निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार यात आधी जॅकलिन फर्नांडिस दिसणार असल्याची चर्चा होती , मात्र आता जॅकलिनचा पत्ता कट करण्यात आला आहे. जॅकलिन सलमानसोबत 'रेस3'मध्ये दिसणार आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार एमी जॅक्सन या चित्रपटात जॅकलिनला रिप्लेस करणार आहे. सध्या एमी 'रोबोट 2'ला घेऊन चर्चेत आहे.  सलमान खानचा किक 2 ख्रिसमसला रिलीज होणार आहे. एमी शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत फ्रीकी अलीमध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. लवकरच ती रजनिकांत आणि अक्षय कुमार यांच्यासोबत 2.0 मध्ये सुद्धा दिसणार आहे. एमी सोशल मीडियावर ही खूप अॅक्टिव्ह असते. 

गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे.  एमी जॉर्ज पानायिटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.  जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली. सध्या जॉर्ज  एमीसोबत क्वॉलिटी टाईम घालवतो आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एमीने स्वत: जॉर्जसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

एमीच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ती व जॉर्ज दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जॉर्ज व एमी दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी आहेत आणि या वर्षांत लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे. तूर्तास हे लग्न कधी व कुठे होणार, हे ठरलेले नाही. पण लवकरच ही तारीखही आपल्याला कळेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Salman Khan's 'Kick 2' entry for Hot Hotrunti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.