​या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:53 IST2018-05-09T10:23:39+5:302018-05-09T15:53:39+5:30

सलमान खानचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले आहे. सलमानच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या असल्या तरी सलमान आजही सिंगल ...

Salman Khan's Fine Salute to Salman Khan | ​या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...

​या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...

मान खानचे आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले आहे. सलमानच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या असल्या तरी सलमान आजही सिंगल आहे. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, युलिया वँटर यांच्या सलमान सोबतच्या प्रेमकथा आजवर चांगल्याच गाजल्या आहेत. सलमान आणि कॅटरिना काही वर्षांपूर्वी नात्यात होते. कॅटरिनाला बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळवून देण्यातही सलमानचा मोठा हात होता. पण दरम्यानच्या काळात कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे अफेअर सुरू झाले. या अफेअरमुळे सलमान आणि कॅटरिनामध्ये दुरावा निर्माण झाला. त्याचकाळात युलिया वँटर सलमानच्या आयुष्यात आली. सलमान आणि ती नात्यात असल्याच्या अनेक बातम्या देखील आल्या. पण सलमान आणि युलिया या दोघांनीही याबाबत मौन राखणेच पसंत केले. पण आता युलिया आणि सलमानचे ब्रेकअप झाले असल्याच्या बातम्या येत आहेत.
युलिया वँटरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेल्या एका मेसेजवरून तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले असल्याचे अनुमान लावले जात आहे. युलियाने तिच्या स्टेटसमध्ये लिहिले आहे की, योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग बनणे म्हणजे प्रेम असा माझा जो समज होता, ते चुकीचे असल्याचे मला आता वाटू लागू लागले आहे. युलियाने असे स्टेटस लिहिल्यामुळे सलमान आणि तिच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. युलियाने असा मेसेज लिहिल्यानंतर सलमानच्या आणि युलियाच्या फॅन्सना वाईट वाटले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण युलियाच्या या स्टेट्सवर सलमानच्या फॅन्सने खूपच मजेशीर कमेंट लिहिल्या आहेत. सलमानच्या एका फॅनने लिहिले आहे की, सलमान खान सिंगलच बरा आहे... तर काही फॅनने भाईने रिजेक्ट कर दिया क्या असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. 
सलमान आणि युलियामध्ये काही बिनसले आहे की नाही हे केवळ ते दोघेच सांगू शकतात. पण सलमानच्या फॅन्सच्या या प्रतिक्रिया पाहाता सलमानच्या फॅन्सना तो सिंगल असल्याचेच आवडत असल्याचे दिसून येत आहे. 

Also Read : या कारणामुळे सलमान खान डान्स करताना स्टेजवर फिरकला नाही अर्जुन कपूर

Web Title: Salman Khan's Fine Salute to Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.