‘या’ तीन मुद्द्यांवरील युक्तिवादामुळेच सलमान खानला मिळाला जामीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 16:23 IST2018-04-07T10:53:53+5:302018-04-07T16:23:53+5:30

काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेला अभिनेता सलमान खानला आज जोधपूरच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने सलमानच्या ...

Salman Khan will get rid of the arguments on 'these' three issues. | ‘या’ तीन मुद्द्यांवरील युक्तिवादामुळेच सलमान खानला मिळाला जामीन!

‘या’ तीन मुद्द्यांवरील युक्तिवादामुळेच सलमान खानला मिळाला जामीन!

ळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेला अभिनेता सलमान खानला आज जोधपूरच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने सलमानच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारे ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी शुक्रवारी आणि शनिवारीही न्यायालयात सलमानच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. सलमानच्या वकिलांनी पहिला युक्तिवाद करताना म्हटले की, उच्च न्यायालयाने माझ्या अशिलाला दोन अन्य प्रकरणांमधून निर्दोष घोषित केले आहे. तसेच न्यायालयात ही बाब अजूनही सिद्ध होऊ शकली नाही की, सलमानने त्याच्या परवाना असलेल्या बंदूकीच्या गोळीनेच काळविटाची शिकार केली आहे. 

सलमानच्या वकिलांनी दुसरा युक्तिवाद करताना म्हटले की, साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. तसेच तिसºया युक्तिवादात म्हटले की, पोस्टमॉर्टेमसाठी काळविटाची केवळ हाडे पाठविण्यात आली होती. तर दुसºया बाजूने सरकारी वकिलांनी म्हटले की, ‘शवविच्छेदनाच्या अहवालातून हे स्पष्ट झाले होते की, काळविटांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला. सरकारी वकिलांनी सलमानकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाचा विरोध करताना म्हटले की, ‘त्याच्याविरोधात साक्षीदारांनी दिलेली साक्ष हा सबळ पुरावा आहे.’

न्यायालयाने दुपारी तीन वाजेनंतर दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेत सलमानला जामीन मंजूर केला. सलमान खानला पुढील सुनावणीसाठी म्हणजेच ७ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. दरम्यान, शनिवारी या प्रकरणाच्या सुनावणीअगोदरच राजस्थान उच्च न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश रवींद्र कुमार यांच्यासह ८७ न्यायाधीशांची बदली केली. 

दरम्यान, जोधपूर न्यायालयाने सलमानला सोडून अन्य सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष मुक्तता केली. सलमान खानला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा अहवाल १९६ पानांचा आहे. सलमानच्या वकिलांनी सुरुवातीपासूनच कमीत कमी शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. तर सरकारी वकिलांकडून सलमानला अधिकाधिक शिक्षा दिली जावी यासाठी एक बाजू लावून धरली होती. 

Web Title: Salman Khan will get rid of the arguments on 'these' three issues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.