७५ रूपयांपासून सुरूवात करणाऱ्या सलमान खानने उभे केले अरबोंचे साम्राज्य; संपत्ती वाचून व्हाल दंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:02 IST2017-12-26T15:30:31+5:302017-12-26T21:02:07+5:30

सलमान खान याला बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकताच त्याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला असून, ...

Salman Khan, who started from Rs. 75, has raised the empire of the Arabs; You will be reading wealth! | ७५ रूपयांपासून सुरूवात करणाऱ्या सलमान खानने उभे केले अरबोंचे साम्राज्य; संपत्ती वाचून व्हाल दंग!

७५ रूपयांपासून सुरूवात करणाऱ्या सलमान खानने उभे केले अरबोंचे साम्राज्य; संपत्ती वाचून व्हाल दंग!

मान खान याला बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकताच त्याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला असून, बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सध्या धूम उडवून देत आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा हा सलमान खानचा बारावा चित्रपट असून, असा रेकॉर्ड करणारा सलमान बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ने केवळ चारच दिवसांत १५० कोटी रूपयांची कमाई केली असून, उद्या २७ डिसेंबर रोजी सलमान या चित्रपटाची सक्सेस पार्टी करणार आहे. 

सलमान गेल्या वीस वर्षांपासून इंडस्ट्रीत आपली सत्ता गाजवित आहे. मात्र हे साम्राज्य त्याला सहजासहजी उभे करता आले नाही. यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की, सलमानची पहिली कमाई केवळ ७५ रूपये इतकी होती. २० वर्षांत त्याने स्वत:ला असे काही सिद्ध केले की, तो आज कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्यामुळेच सर्वाधिक कमाई करणाºया भारतीय कलाकारांच्या यादीत सलमान खान सर्वोच्च स्थानी आहे. नुकतेच फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. त्यामध्ये सलमानला पहिले स्थान देण्यात आले. 



सलमानची एकूण संपत्ती २३३ कोटी रूपये इतकी आहे. गेल्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खानने महाराष्ट्रातील गोराई बीचवर एक घर खरेदी केले होते. हे घर शंभर एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे. वृत्तानुसार हा 5-BHK बंगला आहे. एका रिपोर्टनुसार सलमानने देशातील विविध शहरांमध्ये प्रापॅर्टी खरेदी केली आहे. त्यामध्ये दिल्ली, नोएडा आणि चंदीगढ यांसारख्या शहरांचा समावेश आहे. बांद्रामध्ये सलमानची एक कमर्शियल बिल्डिंगदेखील असून, त्याने ती फ्यूचर ग्रुपला भाड्याने दिली आहे. ही डील पुढील पाच वर्षांसाठी ८० लाख रूपये प्रती महिना याप्रमाणे करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर भाडे ८९.६ लाख प्रति महिना आकारला जाणार आहे. एवढेच नव्हे तर या ग्रुपने सलमानला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून २.४ कोटी रूपये दिले आहेत. ब्रॅण्ड इंडोर्समेंटविषयी सांगायचे झाल्यास सलमानच एक मोठा ब्रॅण्ड आहे. 

बीइंग ह्यूमनच्या नावे सलमान एक मोठी संस्था चालवित आहे. त्याचबरोबर तो अनेक ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. त्याचे मानधन तो ८ ते १० कोटी रूपये आकारतो. सलमानला लग्झरी गाड्यांचा छंद आहे. त्याच्याकडे Royce, Audi, Mercedes and Bentley या महगाड्या कार्स आहेत. या कार्सची एकूण रक्कम १४ कोटी रूपये आहे. सलमान खान दरवर्षी जवळपास १४ कोटी रूपये इनकम टॅक्स भरतो, तर इन्व्हेस्टमेंट पार्ट बघितल्यास त्याची किंमत ३१५ कोटी रूपये आहे. सलमान टीव्हीवरील बिग बॉस या सुपरहिट रिअ‍ॅलिटी शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी ११ कोटी रूपये चार्ज करतो. आगामी काळात सलमानचे बॅक टू बॅक सात चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे त्याच्या संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Salman Khan, who started from Rs. 75, has raised the empire of the Arabs; You will be reading wealth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.