सलमान खान म्हणतो, आता कधीच करणार नाही ‘ती’ चूक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:20 IST2018-03-22T09:50:42+5:302018-03-22T15:20:42+5:30
राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट उद्या २३ मार्चला रिलीज होतोय. सध्या राणी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच प्रमोशनदरम्यान ...

सलमान खान म्हणतो, आता कधीच करणार नाही ‘ती’ चूक!!
र णी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट उद्या २३ मार्चला रिलीज होतोय. सध्या राणी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच प्रमोशनदरम्यान राणीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची सर्वात मोठी ‘हिचकी’ (अडचण या अर्थाने) कोणती आणि त्यावर त्यांनी कशी मात केली, ते जाणून घेतले. याच क्रमात राणी बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानपर्यंत पोहोचली आणि सलमानच्या आयुष्यातील सर्वात मोठी ‘हिचकी’ कुठली आणि ते सर्वांना कळले.
सुरूवातीला मी माझे काम अजिबात गंभीरपणे घेत नव्हतो. हीच माझी ‘हिचकी’ होती, असे सलमानने यावेळी सांगितले. अर्थात आता मी माझे काम गंभीरपणे घ्यायला लागलो आहे. कारण कामापेक्षा चांगले काहीही नाही, हे मला कळून चुकले आहे. मी माझ्या चाहत्यांनाही काम गंभीरपणे घ्या, असेच सांगेल. स्वत:च्या कामाची स्वत:चं प्रशंसा करा, त्याबद्दल समाधान व आभार व्यक्त करा, असे सलमान म्हणाला.
यापूर्वी शाहरूख खान, अनिल कपूर, अजय देवगण, कॅटरिना कैफ, करण जोहर, वरूण धवन आदींनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ‘हिचकी’बद्दल सांगितले होते. शाहरूखने आईवडिलांना गमावणे, ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ‘हिचकी’ असल्याचे म्हटले होते. अनिल कपूरने त्याची स्माईल, कॅटरिनाने तिला डान्स, अजयने त्याचा लुक्स आणि करणने त्याचा आवाज आयुष्यातील सर्वात मोठी ‘हिचकी’ असल्याचे म्हटले होते.
ALSO READ : अनिल कपूरला सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘या’ गोष्टीची वाटायची भीती!
‘हिचकी’ या चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला टॉरेट सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळे ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोनदा बोलते. शिवाय बोलता बोलता विचित्र आवाज काढते. या सवयीमुळे तिच्या आयुष्यात कशी आव्हाने येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाते,हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे. पण या आजारपणामुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही, हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघषार्ची गोष्ट सुरु होते.