सिक्युरिटी गार्डने सलमानच्या बहीणीला मागितले आयडी प्रूफ, मग झाले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 12:23 PM2019-11-24T12:23:07+5:302019-11-24T12:24:14+5:30

सलमानच्या बहीणीला एका विचित्र स्थितीचा सामना करावा लागला

salman khan rakhi sister and pulkit samrat ex-wife shweta rohira was asked to show her id proof at a resto bar | सिक्युरिटी गार्डने सलमानच्या बहीणीला मागितले आयडी प्रूफ, मग झाले असे काही...

सिक्युरिटी गार्डने सलमानच्या बहीणीला मागितले आयडी प्रूफ, मग झाले असे काही...

googlenewsNext
ठळक मुद्देश्वेता ही सलमानची मानलेली बहीण आहे. 2014 मध्ये श्वेताने अभिनेता पुलकित सम्राटसोबत लग्न केले होते.

सलमान खानची मानलेली बहीण आणि अभिनेता पुलकित सम्राटची एक्स-वाईफ श्वेता रोहिरा हिला अलीकडे एका विचित्र स्थितीचा सामना करावा लागला. होय, अलीकडे श्वेता तिच्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली. पण प्रवेशद्वारावर सिक्युरिटी गार्डने श्वेताला अडवले आणि तिला आयडी प्रूफ देण्यास सांगितले. कारण काय तर, श्वेता 18 वर्षांच्या वर आहे, यावर सिक्युरिटी गार्ड विश्वास ठेवायला तयार नव्हता.


श्वेताने स्वत: हा किस्सा सांगितला. ‘होय, मी वर्सोवाच्या सिरोकोमध्ये गेली होती आणि इथे मला वेगळाच अनुभव आला. सिक्युरिटी गार्ड मला काही केल्या आत जाऊ देत नव्हता. त्याने माझ्याकडे आयडी प्रूफ मागितले. खरे तर माझ्यासाठी हा धक्का होता. पण आतल्या आत मला आनंद झाला होता. कारण मी आपल्या वयापेक्षा कमी दिसत होती. सिक्युरिटी गार्ड  मी 18 वर्षांची आहे, हे मानायला तयार नव्हता. मी जवळजवळ  10 मिनिटे पर्समध्ये आयडी प्रूफ शोधले आणि तेव्हा कुठे मी आत जाऊ शकले. माझे सगळे मित्र माझ्यावर हसत होते,’ असे तिने सांगितले.


श्वेता ही सलमानची मानलेली बहीण आहे. 2014 मध्ये श्वेताने अभिनेता पुलकित सम्राटसोबत लग्न केले होते. सलमान या लग्नाला हजर होता. पण यानंतर पुलकित व श्वेता यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनीही घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटाचे कारण पुलकीत व यामी गौतम यांचे अफेअर होते. या प्रकरणानंतर सलमान प्रचंड संतापला होता. याचा परिणाम म्हणजे, अनेक वर्षे पुलकितला बड्या बॅनरचे चित्रपट मिळणे बंद झाले होते. 


पुलकीत व यामीच्या अफेअरच्या चर्चा ब-याच गाजल्या होत्या. पण हे नाते फार काळ टिकले नाही. आता पुलकित अभिनेत्री क्रिती खरबंदाला डेट करतोय.

Web Title: salman khan rakhi sister and pulkit samrat ex-wife shweta rohira was asked to show her id proof at a resto bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.