कॅटरिनाला सलमान वाटतो कुटुंबासारखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 13:37 IST2016-09-13T08:07:55+5:302016-09-13T13:37:55+5:30
सलमान खान व कॅटरिना कैफ हे दोघे पार्टीत सोबत दिसत होते. परंतु, त्यांचे नाते हे जास्त दिवस टिकू शकले ...
.jpg)
कॅटरिनाला सलमान वाटतो कुटुंबासारखा
अलीकडेच कॅटरीनाने केलेल्या एका वक्तृव्यामुळे त्या दोघांच्या संबंधाची पुन्हा चर्चा होत आहे. एका इव्हेंटमध्ये कॅटरिनाला विचारले गेले होते की, इंडस्ट्रीमध्ये असा कोण आहे, की त्याच्यासोबत तुला कुटुंबासारखे वाटते. यावर तिने कोणताही विचार न करता सलमान खानचे नाव सांगितले.
सलमान खान कॅटरिनाचा चित्रपट ‘बार बार देखो‘ चाही प्रमोट करताना दिसला होता. सलमानच्या भावाचा फ्रीकी अली व कॅटरिनाचा बार बार देखो हे दोन्हीही चित्रपट सोबत पडद्यावर आले होते. सलमानने शेअर केलेल्या एका व्हीडीओमध्ये तो काला चश्मा व बार बार देखो व फ्रीकी अलीचे नाव घेताना दिसत आहे. सध्याला सलमान ट्युबलाईटच्या शुटींगसाठी मनाली येथे आहे.