सलमान खान, कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ची मुंबईमध्ये सुरू झाली शूटिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 21:03 IST2017-04-02T15:25:56+5:302017-04-02T21:03:03+5:30
सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर मोस्ट अवेटेड ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या भागाचे शूटिंग आॅस्ट्रिया येथे ...
सलमान खान, कॅटरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ची मुंबईमध्ये सुरू झाली शूटिंग!!
स मान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर मोस्ट अवेटेड ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या भागाचे शूटिंग आॅस्ट्रिया येथे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. आता दुसºया भागाचे शूटिंग सुरू केले जाणार असून, मुंबई हे ठिकाण त्यासाठी निवडण्यात आले आहे. सूत्रानुसार शूटिंगला सुरुवातदेखील करण्यात आली आहे.
मुंबई येथील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दुसºया भागाचे शूटिंग केले जाणार आहे. तब्बल दहा दिवसांचे शूटिंगचे शेड्यूल्ड असल्याने सलमान आणि कॅटरिना यांना मुंबईमध्येच ठाण मांडून राहावे लागणार आहे. मुंबईनंतर दुबई आणि त्यानंतर मोरोक्को येथे सलमान आणि कॅटरिना रवाना होणार आहेत. सूत्रानुसार सलमान ‘टायगर जिंदा है’ची शूटिंग लवकरच पूर्ण करू इच्छितो. कारण त्याला या चित्रपटानंतर लगेचच त्याच्या ‘दबंग’ सीरिजला सुरुवात करायची आहे.
![]()
दरम्यान, आॅस्ट्रिया येथे झालेल्या शूटिंगवरून या चित्रपटात अॅक्शनचा भडीमार करण्यात आल्याचे दिसत आहे. आॅस्ट्रियात काही अॅक्शन सीन्सबरोबरच ‘दिल दिया’ या रोमॅण्टिक गाण्याचे शूटिंग करण्यात आले. कॅटरिना केवळ या गाण्यासाठीच आॅस्ट्रियाला पोहोचली होती. या गाण्याला वैभवी मर्चेंट हिने कोरिओग्राफ केले आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने कॅटरिनासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, ‘टायगर जिंदा है’मध्ये पुन्हा एकत्र !
२०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ याच चित्रपटाचा हा सीक्वल आहे. त्यामध्येदेखील सलमान आणि कॅटरिना ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तब्बल पाच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहे. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. अशात ‘टायगर जिंदा है’मध्ये त्यांची केमिस्ट्री कितपत रंगणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.