​सलमानला दिलासा पण शाहरूखला दणका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 18:22 IST2016-07-25T12:52:54+5:302016-07-25T18:22:54+5:30

बॉलिवूडच्या एका ‘खान’ला  सोमवारी मोठा दिलासा मिळाला पण त्याचवेळी दुस-या एका ‘खान’ला जोरदार झटका बसला. होय, एकीकडे काळवीट शिकार ...

Salman Khan gets relief from Shahrukh Khan | ​सलमानला दिलासा पण शाहरूखला दणका!!

​सलमानला दिलासा पण शाहरूखला दणका!!

लिवूडच्या एका ‘खान’ला  सोमवारी मोठा दिलासा मिळाला पण त्याचवेळी दुस-या एका ‘खान’ला जोरदार झटका बसला. होय, एकीकडे काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानची सुटका झाली. मात्र दुसरीकडे किंगखान शाहरूख खान याला इन्कम टॅक्स अर्थात  प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवत जोरदार झटका दिला. प्राप्तिकर विभागाने  शाहरुखला त्याच्या परदेशांतील गुंतवणुकीबाबत विचारणा करणारी नोटीस पाठवली आहे. प्राप्तिकर विभागाने शाहरुखच्या ब्रिटिश वर्जिन आयलँड, बम्यूर्डा, दुबई आणि इतर देशांमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत विचारणा केली आहे.
कलम १३१ अन्वये शाहरुखला ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान दोषी आढळल्यास त्याला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटसृष्टीतील अनेकांना यासंदभार्तील नोटीस देण्यात आली आहे. काळ्या पैशाची मुळे शोधण्यासाठी चुकीच्या मार्गांनी कमवलेला पैसा आणि भारतीयांच्या परदेशी बँकांमधील खात्यांवर प्राप्तिकर विभाग करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे शाहरुखला पाठवलेल्या या नोटीशीबाबत त्याची प्रतिक्रिया काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Salman Khan gets relief from Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.