सलमान खानसोबत एकाही पोलिसाने सेल्फी काढला नाही; अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 17:30 IST2018-04-07T11:57:53+5:302018-04-07T17:30:32+5:30

सुपरस्टार सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवित जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावताना त्याची थेट जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ...

Salman Khan did not get any self-help from Salman Khan; Information provided by the authorities! | सलमान खानसोबत एकाही पोलिसाने सेल्फी काढला नाही; अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

सलमान खानसोबत एकाही पोलिसाने सेल्फी काढला नाही; अधिकाऱ्यांनी दिली माहिती!

परस्टार सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवित जोधपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावताना त्याची थेट जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून सलमान तुरुंगात आहे. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला असून, सायंकाळपर्यंत त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुरुंगात तो बॅरक नं. २ मध्ये कैदी नं. १०६ म्हणून होता. यादरम्यान, तो तुरुंगात काय करत होता, कोणाला भेटत होता, काय खात होता याबाबतची संपूर्ण माहिती कारागृह अधीक्षकांकडून देण्यात आली. जोधपूरच्या कारागृह अधिकाºयांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सलमान खानला बाहेरचे जेवण दिले गेले नाही. कारागृहात बनविण्यात आलेले जेवणच त्याला देण्यात आले. 

-  मध्यवर्ती कारागृहात सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या परिवारातील सदस्य आठवड्यातून केवळ सहा वेळा येऊ शकतील, असे सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. 
- कारागृहात कुठल्याही प्रकारचा फोटो काढण्यात आला नाही. 
- कारागृह परिसरात मोबाइल फोन वापरण्यास अजिबात परवानगी नव्हती. 
- बाहेरचे जेवण कारागृहात नेऊ दिले नाही, सलमानला कारागृहातीलच जेवण देण्यात आले. 
- कारागृह प्रशासनाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सलमानच्या नातेवाईकांना त्याची भेट घेण्यासाठी सोडले. 
- एकाही पोलीस अधिकाºयाने सलमानसोबत सेल्फी काढला नाही वा तसा प्रयत्नही केला नाही. 
(नोट : यावेळी कारागृह अधिकाºयांनी सलमान कारागृहातील बॅरकच्या बाहेर आहे की आत याबाबतचे उत्तर देण्यास नकार दिला.)

Web Title: Salman Khan did not get any self-help from Salman Khan; Information provided by the authorities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.