सलमान खानने बदलले ‘या’ अभिनेत्याचे लक; इमोशनल होऊन इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘लव यू मामू’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 16:59 IST2018-04-07T11:29:15+5:302018-04-07T16:59:22+5:30

सलमान खानने आतापर्यंत अनेक कलाकारांच्या करिअरला दिशा दिली आहे. आता या यादीत बॉबी देओलचेही नाव जोडले गेले असून, सलमानला शिक्षा झाल्याचे समजताच तो भावुक झाल्याचे दिसून आले.

Salman Khan changed the 'or' actor; Being emotional and written on Instagram, 'Love You Mamu'! | सलमान खानने बदलले ‘या’ अभिनेत्याचे लक; इमोशनल होऊन इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘लव यू मामू’!

सलमान खानने बदलले ‘या’ अभिनेत्याचे लक; इमोशनल होऊन इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘लव यू मामू’!

िनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावताच संपूर्ण बॉलिवूड त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करीत आहेत. सध्या सलमानला जोधपूर न्यायालयाने दिलासा देत त्याचा जामीन मंजूर केला आहे. परंतु दोन दिवस सलमानची सुटका केव्हा होईल याविचाराने संपूर्ण बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण होते. बॉलिवूडसह क्रिकेट आणि राजकीय मंडळींकडून आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देताना सलमानचे समर्थन केले. आता अशीच काहीशी प्रतिक्रिया अभिनेता बॉबी देओल याच्याकडून आली आहे. बॉबी सलमानच्या आगामी ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. बॉबीने इन्स्टाग्रामवर सलमानसोबतचा एक फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये ‘लव यू मामू’ असे लिहिले आहे. 

बºयाच काळानंतर बॉबी देओल इंडस्ट्रीमध्ये परतला आहे. वृत्तानुसार, सलमान खाननेच त्याचे करिअर पटरीवर आणले आहे. एवढेच काय तर सलमानने त्याच्या आगामी ‘रेस-३’मध्येही बॉबीला कास्ट करण्याचा निर्मात्यांना सल्ला दिला होता. आता तो सलमानसोबत ‘रेस-३’मध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे सलमान त्याला ‘किक-२’मध्येही कास्ट करणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सलमानच्या मदतीने बॉबीने ‘हाउसफुल-४’ हा चित्रपटही साइन केला आहे. 
 

बॉबी देओल जेव्हापासून सलमानसोबत आला तेव्हापासून त्याचा पूर्ण मेकओव्हर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉबीने त्याच्या जबरदस्त फिजीकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. 

Web Title: Salman Khan changed the 'or' actor; Being emotional and written on Instagram, 'Love You Mamu'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.