सलमानला आपल्या सल्ल्याची गरज नाही- फराह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 12:31 IST2016-08-16T07:01:22+5:302016-08-16T12:31:22+5:30
कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानने एका कार्यक्रमात मीडियावर चांगलेच तोंडसुख घेतले. एका कार्यक्रमात जेव्हा तिला विचारण्यात आले की, तु सलमानला पालक ...

सलमानला आपल्या सल्ल्याची गरज नाही- फराह
क रिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानने एका कार्यक्रमात मीडियावर चांगलेच तोंडसुख घेतले. एका कार्यक्रमात जेव्हा तिला विचारण्यात आले की, तु सलमानला पालक होण्यासंबंधी काय सल्ला देशील, तेव्हा तिने कडक शब्दांत सांगितले की, सलमान खुप हुशार आणि आपल्या सर्वांपेक्षा खुप यशस्वी आहे. त्यामुळे त्याला पालक होण्यासंबंधी किंवा मुलबाळांविषयी आपल्या सल्ल्याची गरज नाही. तो तेवढा समर्थ आहे.
आता फराहचे असे सडेतोड उत्तर ऐकून उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानच्या लग्नाचा विषय सुरू आहे. यावर्षी तो अखेर तथाकथित गर्लफ्रेंड युलिया वंटुरशी लग्न करणार असल्यामुळे तर याविषयीच्या चर्चांना आणखी उधाण आलेले आहे.
काही दिवसांपूर्वीदेखील शिल्पा शेट्टीने सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारल्यावर वैतागुन म्हटले होते की, त्याच्या लग्नाची तारीख जरी १८ नोव्हेंबर सांगितली जात असली तरी वर्ष पण एकदा विचारून घ्या. आता बॉलीवूड सेलिब्रेटिज्ना सल्लुमियांच्या लग्नाविषयी विचारल्यावर एवढा राग का येते हे काही कळण्यास मार्ग नाही.
![Farah]()