सल्लूमियाँ गोव्याहून मुंबईत परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 18:46 IST2016-11-03T18:46:20+5:302016-11-03T18:46:20+5:30

तुमच्या-आमच्याप्रमाणेच सेलिब्रिटींचेही दिवाळीसाठी काही खास प्लॅन्स असतात. अर्थात आपण मित्र-मंडळी, नातेवाईकांच्या घरी जाऊन, परस्परांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करतो. ...

Salloomies returned to Goa from Goa | सल्लूमियाँ गोव्याहून मुंबईत परतला

सल्लूमियाँ गोव्याहून मुंबईत परतला

मच्या-आमच्याप्रमाणेच सेलिब्रिटींचेही दिवाळीसाठी काही खास प्लॅन्स असतात. अर्थात आपण मित्र-मंडळी, नातेवाईकांच्या घरी जाऊन, परस्परांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी करतो. तर सेलिब्रिटी परदेशात जाऊन तर जंगी पार्टी देऊन दिवाळी साजरी करतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यानेही यंदाची दिवाळी साजरी केली. पण परदेशात नव्हे तर गोव्यात. होय, गोव्याच्या समुद्रकिनारी त्याने त्याच्या फॅमिलीसह दिवाळी सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशननंतर तो नुकताच मुंबईत परतला आहे.

‘सुल्तान’पासून सलमान कायम बिझी आहेत. त्यामुळे त्याला तशीही कामातून ब्रेक घेण्याची गरज होतीच. दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्ताने त्याने ही संधी साधली. गोव्याहून मुंबई विमानतळावर उतरलेला सलमान गे्र कलरचा टीशर्ट, निळ्या रंगाची जीन्स अन् पांढºया रंगाच्या शूजमध्ये दिसून आला. अगदी अलीकडे सलमानने  कबीर खान याच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. लवकरच तो यशराज फिल्म्सच्या ‘टायगर जिंदा हैं’ मध्ये बिझी होणार आहे. यात तो कॅटरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Web Title: Salloomies returned to Goa from Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.