रोहित शेट्टीचा सिम्बाला रणवीर सिंगमुळे होणार उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 16:00 IST2018-05-08T10:30:41+5:302018-05-08T16:00:41+5:30
रोहित शेट्टीच्या दिग्दर्शित रणवीर सिंग आणि सारा अली खानचा सिम्बा हा या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे. चित्रपटाचा पहिले ...

रोहित शेट्टीचा सिम्बाला रणवीर सिंगमुळे होणार उशीर
र हित शेट्टीच्या दिग्दर्शित रणवीर सिंग आणि सारा अली खानचा सिम्बा हा या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे. चित्रपटाचा पहिले पोस्टर आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांनामध्ये या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुकता दिसली. मात्र आता रणवीरच्या फॅन्सना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 'सिम्बा'ची शूटिंग सुरु व्हायला वेळ लागणार आहे. याआधी सिम्बाची शूटिंग मे महिन्यात सुरु होणार होती मात्र रणवीर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शूटिंग सुरु व्हायला वेळ लागू शकतो.
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेंपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. टेंपरमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र सिम्बामध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.‘सिम्बा’ हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
रणवीरच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तो दीपिका पादुकोणसोबत विवाह बंघनात अडकणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्ना दरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे